SEE PHOTOS: करिश्मा कपूरचा ‘कथित’ बॉयफ्रेंड संदीप तोष्णिवाल बनला कपूर खानदानाचा सदस्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 13:54 IST2017-02-17T08:24:44+5:302017-02-17T13:54:44+5:30

करिश्मा कपूर आणि करिना कपूर यांनी त्यांचे वडिल रणधीर कपूर यांचा ७० वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला. त्यासाठी ...

SEE PHOTOS: Karitma Kapoor's 'alleged' boyfriend Sandeep Tosniwal became a member of Kapoor Khanadan? | SEE PHOTOS: करिश्मा कपूरचा ‘कथित’ बॉयफ्रेंड संदीप तोष्णिवाल बनला कपूर खानदानाचा सदस्य?

SEE PHOTOS: करिश्मा कपूरचा ‘कथित’ बॉयफ्रेंड संदीप तोष्णिवाल बनला कपूर खानदानाचा सदस्य?

िश्मा कपूर आणि करिना कपूर यांनी त्यांचे वडिल रणधीर कपूर यांचा ७० वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा केला. त्यासाठी आयोजित शानदार पार्टीमध्ये इंडस्ट्रीमधील सर्व दिग्गज आणि संपूर्ण कपूर खानदान उपस्थित होते. मात्र सिनेतारकांच्या गोतावळ्यात एका व्यक्तीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ती व्यक्ती म्हणजे ‘लोलो’ करिश्माचा ‘कथित’ बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवाल.

मागच्या अनेक महिन्यांपासून संदीप आणि करिश्मा यांचे अफेयर सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. पतीपासून वेगळी झाल्यानंतर ती आणि संदीप ‘लिव्ह इन-रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याचेदेखील म्हटले जाते. पण दोघांनीही कधी एकमेकांविषयी प्रेमाची कबुली दिलेली नाही. मात्र रणधीर कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये संदीपचा ज्याप्रमाणे वावर होता त्यावरून तो कपूर खानदाना सदस्य बनला आहे असे दिसतेय.

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal-

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal

karisma-kapoor-and-sandeep-toshniwal-

या स्टार-स्टडेड पार्टीतील काही फोटो बाहेर आले आहेत ज्यामध्ये करिश्मा आणि संदीप पाहुण्यांशी गप्पा मारताना दिसतात. पार्टीत सैफ अली खान, रणधीर कपूरची पत्नी बबीता, ऋषी आणि नितू कपूर तसेच कपूर घराण्याची यंग जनेरशनसुद्धा उपस्थित होती. तसेच मेगास्टार अमिताभ बच्चन आणि रेखा हे दोघे एकाच वेळी पार्टीमध्ये होते. क्वचितच हे दोघे असे एकत्र कार्यक्रमात उपस्थित राहतात.

गेल्या वर्षी करिश्मा आणि तिचा पूर्व पती संजय कपूर यांचा विवादित घटस्फोट झाला. दोन्ही मुलांसह - समीरा आणि कियानराज - करिश्मा आईवडिलांसोबत राहू लागली. संदीपचा तिच्या जीवनात प्रवेश झाल्यानंतर ते दोघे एकत्र राहू लागले अशी चर्चा आहे. संदीप हा एका औषधाच्या कं पनीचा सीईओ असून पहिल्या पत्नीपासून त्याने फारकत घेतलेली आहे.

karisma-kapoor-and-saif

डिसेंबर महिन्यात करिश्माने इन्स्टाग्रामवर सैफसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तिच्या हातातील ‘रिंग’ पाहून तिने एंगेजमेंट केली की काय अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. अद्याप दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. कपूर घराणाच्या प्रत्येक कार्यक्रमाला संदीपची उपस्थिती पाहून तो केवळ फॅमिली फे्रंड राहिलेला नसून आता फॅमिली मेंबरच झाल्याची शक्यता अधिका आहे.

 ALSO READ: बॉयफ्रेंड संदीप तोष्णीवालसोबत करिश्मा कपूर राहणार एकाच घरात!

Web Title: SEE PHOTOS: Karitma Kapoor's 'alleged' boyfriend Sandeep Tosniwal became a member of Kapoor Khanadan?