SEE : ​लीजा हेडनने असा साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस! पाहा, सेलिब्रेशनचे काही खास फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 11:31 IST2017-10-31T06:01:20+5:302017-10-31T11:31:20+5:30

अभिनेत्री लीजा हेडन आणि तिचा लाडका हबी डिनो ललवानी यांच्या लग्नाला रविवारी (२९ आॅक्टोबर)  एक वर्ष पूर्ण झाले. म्हणजेच, ...

SEE: Lisa Hayden celebrates her first birthday! Look, some special photos of celebration !! | SEE : ​लीजा हेडनने असा साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस! पाहा, सेलिब्रेशनचे काही खास फोटो!!

SEE : ​लीजा हेडनने असा साजरा केला लग्नाचा पहिला वाढदिवस! पाहा, सेलिब्रेशनचे काही खास फोटो!!

िनेत्री लीजा हेडन आणि तिचा लाडका हबी डिनो ललवानी यांच्या लग्नाला रविवारी (२९ आॅक्टोबर)  एक वर्ष पूर्ण झाले. म्हणजेच, गत रविवारी लीजा व डिनो यांचा लग्नाचा पहिला वाढदिवस होता. आता लग्नाचा पहिला वाढदिवस म्हटल्यावर सेलिब्रेशन तर होणारच. लीजा आणि डिनो या दोघांनीही धम्माल सेलिब्रेशन केले. केवळ लीजा व डिनो या दोघांनीच नाही तर त्यांचा उण्यापु-या सहा महिन्यांचा मुलगा जॅक हा सुद्धा या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला. अंदमान बेटावरच्या लँगकावी येथे लीजा, डिनो यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. याचे काही फोटो लीजा व डिनोने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.





यात डस्की ब्युटी लीजा डिनोसोबत रोमॅन्टिक पोझ देताना दिसतेय. काही फोटोंमध्ये लाडका जॅकही त्यांच्यासोबत आहे. मम्मी-पापासोबत क्यूट जॅकला पाहणे चाहत्यांसाठी निश्चितपणे पर्वणी आहे.





हे फोटो डिनोने पोस्ट केले आहेत. लीजावरच्या त्याच्या प्रेमाची प्रचिती देणारे हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये लीजा ब्लॅक बिकनीत अतिशय सुंदर दिसतेय.





 लीजाने २९ आॅक्टोबर २०१६ मध्ये  डिनोसोबत विवाह केला होता. दीड वर्ष डेटिंग केल्यानंतर हे दोघेही विवाहबंधनात अडकले होते. थायलॅण्ड, फुकेट स्थित अमनपुरी बीच रिसॉर्टमध्ये अतिशय शाही पद्धतीने या दोघांनी विवाह केला होता. या विवाहाचे फोटोदेखील लीजाने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. 





ALSO READ: लीजा हेडन नव्हे तर ‘या’ हॉलिवूड ‘मॉम’नेही शेअर केलेत ब्रेस्टफिडिंगचे फोटो!

लीजाचा पती डिनो हा पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश एंटरप्रेन्योर गुल्लू ललवानी यांचा मुलगा आहे. लीजा अखेरीस ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. लीजाने  आयशा, रास्कल, क्वीन, द शौकिन्स, संता बंता प्रायवेट लिमिटेड, हाउसफुल- ३  आदी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.   यावर्षी १७ मे रोजी लीजाने जॅकला जन्म दिला. तूर्तास लीजा बाळाच्या संगोपणात व्यक्त आहे आणि मातृत्व मस्तपैकी एन्जॉय करतेय. लीजा सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. डे टू डे लाईफचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Web Title: SEE: Lisa Hayden celebrates her first birthday! Look, some special photos of celebration !!