सारा अली खानच्या या फोटोंनी खूप होतेय चर्चा, सोबतचा ‘हा’ मिस्ट्री ब्वॉय आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 12:32 IST2020-09-03T12:32:10+5:302020-09-03T12:32:34+5:30

ब्ल्यू लिपस्टिक, मोकळे केस, डोळ्यांवर गॉगल... खूप व्हायरल होत आहेत हे फोटो

Sara Ali Khan flaunts her blue lipstick in her new beach pictures |  सारा अली खानच्या या फोटोंनी खूप होतेय चर्चा, सोबतचा ‘हा’ मिस्ट्री ब्वॉय आहे तरी कोण?

 सारा अली खानच्या या फोटोंनी खूप होतेय चर्चा, सोबतचा ‘हा’ मिस्ट्री ब्वॉय आहे तरी कोण?

ठळक मुद्देयाशिवाय अक्षय कुमार आणि धनुषससह सारा ‘अतरंगी रे’ सिनेमात दिसणार आहे.

कोरोनामुळे बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी आपआपल्या घरात कैद आहेत. मात्र काही सेलिब्रिटींनी आपल्या घराबाहेर निघणे सुरु केले आहे. याचदरम्यान सैफ अली खानची लेक सारा अली खान बीचवर ‘कातिलाना’ अंदाजात दिसली.  बीचवरचे काही फोटो साराने सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोमध्ये सारा एका मिस्ट्री ब्वॉयसोबत दिसतेय.

फोटोतील साराचा लूक हटके आहे. टील ब्ल्यू कलरची लिपस्टिक, मोकळे केस, डोळ्यांवर गॉगल, व्हाईट प्रिंटेड शर्ट आणि डेनिम शॉर्ट असा तिचा लूक आहे. तिच्या या लूकवर आमिर खानची लेक इरा खान हिनेही कमेंट केली आहे. मला तुझी लिपस्टिक आवडली, असे इराने लिहिले आहे.

सध्या साराचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वी तिने भावासोबतचे फोटो शेअर केले होते. तिच्या या फोटोंनीही सोशल मीडियावर धूम केली होती.

सारा अली खानने 2018 मध्ये ‘केदारनाथ’ सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘सिम्बा’ सिनेमात झळकली. या सिनेमाने बॉक्स  ऑफिसवरही दमदार कमाई केली. पण साराचा अलीकडे रिलीज झालेला ‘लव आज काल’ सिनेमाने बॉक्स  ऑफिसवर काही खास कामगिरी केली नव्हती. तसेच सारा ‘कुली नंबर 1’ सिनेमामध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये वरुण धवन तिच्यासोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असले तरीही सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.

याशिवाय अक्षय कुमार आणि धनुषससह सारा ‘अतरंगी रे’ सिनेमात दिसणार आहे. लॉकडाऊनपूर्वी या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात झाली होती. त्यानंतर शूटिंगला ब्रेक लागला आणि आता ऑक्टोबरपासून सिनेमाच्या शूटिंगला पुन्हा सुरूवात होणार आहे.

Web Title: Sara Ali Khan flaunts her blue lipstick in her new beach pictures