संजय लीला भन्साळी रुग्णालयात? हार्ट ॲटॅक आल्याची बातमी केवळ अफवा; टीमने केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 14:05 IST2026-02-25T14:05:01+5:302026-02-25T14:05:38+5:30

आज बुधवारी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना हृदयविकाराचा धक्का आल्याच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. नक्की सत्य काय?

sanjay leela bhansali s team clarifies director did not had heart attack nor admitted in hospital | संजय लीला भन्साळी रुग्णालयात? हार्ट ॲटॅक आल्याची बातमी केवळ अफवा; टीमने केलं स्पष्ट

संजय लीला भन्साळी रुग्णालयात? हार्ट ॲटॅक आल्याची बातमी केवळ अफवा; टीमने केलं स्पष्ट

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सध्या व्हायरल झाली आहे. कालच भन्साळी यांनी ६३ वा वाढदिवस साजरा केला. तर आज त्यांना हार्टअॅटॅक ाल्याने रुग्णालयात दाखल केल्याची बातमी आली. यामुळे चाहते चिंतेत आहेत. मात्र आता त्यांच्या टीमने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते एकदम स्वस्थ असल्याचं टीमने स्पष्ट केलं आहे.

आज बुधवारी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना हृदयविकाराचा धक्का आल्याच्या बातमीने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्यांच्या टीमने पुढे येत ही केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. ही केवळ अफवा असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही असं सांगितलं. यावरुन या चर्चा खोट्या आणि निराधार असल्याचंही स्पष्ट केलं. त्यामुळे भन्साळीच्या यांच्या आरोग्यासंबंधी कोणत्याही चर्चांवर विश्वास ठेवू नका असंही सांगण्यात आलं.

संजय लीला भन्साळी सध्या 'लव्ह अँड वॉर' सिनेमाच्या शूटिंगमध्ये दिवस रात्र व्यग्र आहेत. रणबीर कपूर, आलिया भट आणि विकी कौशल यामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. काल वाढदिवशीही त्यांनी सेटवरच जाऊन काम करणं पसंत केलं. त्यांची कामाप्रती निष्ठा सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या प्रत्येक सिनेमांमध्ये भव्यता ही पाहण्यासारखी असते. तेच त्यांच्या सिनेमांचं वैशिष्ट्य असतं. आता 'लव्ह अँड वॉर'मध्येही काय पाहायला मिळणार यासाठी चाहते आतुर आहेत.

Web Title : संजय लीला भंसाली अस्पताल में? हार्ट अटैक की अफवाह, टीम ने किया खंडन

Web Summary : संजय लीला भंसाली को दिल का दौरा पड़ने की खबरें झूठी हैं। उनकी टीम ने स्पष्ट किया कि वह स्वस्थ हैं। वह रणबीर कपूर, आलिया भट्ट और विक्की कौशल के साथ 'लव एंड वॉर' की शूटिंग में व्यस्त हैं।

Web Title : Sanjay Leela Bhansali Hospitalization: Heart Attack Rumors Denied by Team

Web Summary : Reports of Sanjay Leela Bhansali suffering a heart attack are false. His team clarified he is healthy and well, dismissing the rumors. He is currently busy shooting for 'Love and War' with Ranbir Kapoor, Alia Bhatt and Vicky Kaushal.