​सलमानच्या ‘ट्यूबलाईट’मध्ये अरिजीत गाणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 18:23 IST2016-08-21T12:53:26+5:302016-08-21T18:23:26+5:30

एका पुरस्कार सोहळ्यात अरिजीतने सलमानवर आक्षेपार्ह भाष्य केलं होते. यामुळे निर्माण झालेला वाद सलमान आणि अरिजीत सिंग मधला वाद ...

Salman's 'tubelight' will be released! | ​सलमानच्या ‘ट्यूबलाईट’मध्ये अरिजीत गाणार !

​सलमानच्या ‘ट्यूबलाईट’मध्ये अरिजीत गाणार !


/>एका पुरस्कार सोहळ्यात अरिजीतने सलमानवर आक्षेपार्ह भाष्य केलं होते. यामुळे निर्माण झालेला वाद सलमान आणि अरिजीत सिंग मधला वाद सर्वांना परिचीत आहेच. त्या वादामुळे अरिजीत सलमानसाठी कधीच गाणार नाही अशा अफवापण ऐकायला मिळाल्या होत्या. मात्र सलमानच्या आगामी ‘ट्युबलाईट’चित्रपटासाठी गाणार असल्याचं स्वत: अरिजीतने सांगितलं आहे.
नको तो शिक्का स्वत:वर बसवून घेण्यासाठी आणि घमेंड ठेवण्यासाठी आपण काहीच नाही, असं अरिजीतने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. आपण नेहमीच सलमानसोबत आहोत, शिवाय आगामी ‘ट्युबलाईट’ सिनेमातही गाणार आहोत, असं अरिजीतने सांगितलं आहे.
अरिजीतने सलमानची फेसबुकवर पत्र लिहून जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर दोघांचा वाद चर्चेत आला होता.  सलमानचा ‘ट्युबलाईट’ सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

Web Title: Salman's 'tubelight' will be released!