सस्पेन्स, ॲक्शन, ड्रामा आणि टॉवेल फाईट सीक्वन्स...'टायगर 3'चा नवीन प्रोमो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 12:53 PM2023-11-03T12:53:09+5:302023-11-03T12:54:03+5:30

‘स्पाय युनिव्हर्स’मधील ‘टायगर ३’चा नवा प्रोमो आज प्रदर्शित झाला आहे.

Salman Khan, Katrina Kaif, Emraan Hashmi's Tiger 3' new promo is out | सस्पेन्स, ॲक्शन, ड्रामा आणि टॉवेल फाईट सीक्वन्स...'टायगर 3'चा नवीन प्रोमो आला समोर

सस्पेन्स, ॲक्शन, ड्रामा आणि टॉवेल फाईट सीक्वन्स...'टायगर 3'चा नवीन प्रोमो आला समोर

गेल्या काही दिवसांपासून ‘टायगर ३’ चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर टायगर ३ रिलीज होतोय. पहिल्या दोन्ही सिनेमांचं ब्लॉकबस्टर यश पाहता तिसऱ्या भागाकडूनही चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. ‘स्पाय युनिव्हर्स’मधला पुढचा चित्रपट ‘टायगर ३’चा नवा प्रोमो आज प्रदर्शित झाला आहे.

५० सेंकदाच्या या प्रोमोची सुरुवात इम्रान हाश्मीच्या डॉयलॉग्सने सुरू होते. तर सलमान खान जबरदस्त ॲक्शन करताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, इम्रान हाश्मीचा जबरदस्त अंदाज खिळवून ठेवणारा आहे. प्रोमोध्ये कतरिना कैफची टॉवेल फाईटही दिसत आहे. हा टॉवेल फाईट सीक्वन्स 'टायगर ३'  मधील सर्वांत जास्त चर्चेचा मुद्दा बनला आहे. 

'टायगर ३'चा हा दमदार प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. १२ ऑक्टोबर दिवाळीच्या दिवशीच सिनेमा प्रदर्शित होतोय. त्या दिवशी रविवारही आहे. त्यामुळे या सुट्ट्यांचा सिनेमाला फायदा होणार यात शंका नाही. सिनेमा हिंदी, तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. 'टायगर ३' या एक्शन-थ्रिलर सिनेमाचं मनीष शर्मा यांनी दिग्दर्शन केलं आहे. तर आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे.

टायगर ३ मधून सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी अनेक वर्षांनंतर थिएटरमध्ये परतत आहे. या दोघांनी आतापर्यंत 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' असे दोन बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. शिवाय, या चित्रपटात सलमान खानसोबतशाहरुख खानचा खास १५  मिनिटांचा कॅमिओ असणार आहे. ‘पठाण’मध्ये एकत्र झळकल्यानंतर आता पुन्हा दोन्ही खानांना एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहणं ही चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे. चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
 

Web Title: Salman Khan, Katrina Kaif, Emraan Hashmi's Tiger 3' new promo is out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.