Sangeeta Bijlani : संगीता बिजलानी मजेत फोटोशूट करत होती, पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 05:01 PM2022-11-15T17:01:03+5:302022-11-15T17:02:11+5:30

Sangeeta Bijlani : सॅटीनचा लाल ड्रेस घालून संगीता फोटोशूट करत होती. तिच्या डोक्यावरून कबुतरं उडत होती. अचानक...

Salman Khan Ex Girlfriend Sangeeta Bijlani Gets Attacked by Birds Watch Video | Sangeeta Bijlani : संगीता बिजलानी मजेत फोटोशूट करत होती, पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ

Sangeeta Bijlani : संगीता बिजलानी मजेत फोटोशूट करत होती, पुढे काय घडलं? पाहा व्हिडीओ

googlenewsNext

एकेकाळी बॉलिवूडची ‘बिजली’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री संगीता बिजलानी ( Sangeeta Bijlani ) एक लोकप्रिय अभिनेत्री. एक काळ तिने गाजवला. आताश: ती सिनेमात दिसत नाही. पण सोशल मीडियावर मात्र ती बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. रोज नवे फोटो, व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या  तिचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. यात संगीता लाल रंगाचा ड्रेस घालून फोटोशूट करताना दिसतेय. पण हे फोटोशूट करताना असं काही घडलं की, संगीता घाबरून किंचाळली.

सॅटीनचा लालचटक ड्रेस घालून संगीता फोटोशूट करत होती. तिच्या डोक्यावरून कबुतरं उडत होती. अचानक एक  कबूतर तिच्या पायाजवळ आलं आणि बिजलानीची घाबरगुंडी उडाली.  voomplaने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

या व्हिडीओवर लोकांनी एकापेक्षा एक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. ‘यहां भी अ‍ॅक्टिंग करोगी तो ये एंटरटेन थोडी करेंगे बहन,’ अशी कमेंट एका युजरने दिली. काहींनी तिला ओव्हरअ‍ॅक्टिंग म्हणत तिची खिल्ली उडवली. बिचाऱ्या त्या पक्ष्याच्या पंखांचा जराचा स्पर्श झाला तर इतकी घाबरली, इतकी ओव्हरअ‍ॅक्टिंग, अशी कमेंट एका युजरने केली. खाली पडलीस ना तर सगळी अ‍ॅक्टिंग विसरून जाशील, असंही एका युजरने लिहिलं.

 1980 साली संगीतानं मिस इंडियाचा किताब पटकावला आणि त्यानंतर 8 वर्षांनी बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली. पण फिल्मी करिअर फार काही चाललं नाही. चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्याचीच चर्चा जास्त झाली. सलमान खानसोबतच्या नात्यानं तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. सलमानसोबत लग्नापर्यंत पोहोचलेलं हे नातं अचानक संपलं आणि एकाकी पडलेल्या संगीताच्या आयुष्यात एका नव्या पुरूषाची एन्ट्री झाली. तो होता क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन. अर्थात पुढे संगीता आणि अजहर दोघांचही पटेनासं झालं. संगीतानं अजहरशी घटस्फोट घेतला. त्यानंतर संगीता दुसऱ्या लग्नाच्या भानगडीत पडली नाही. पण हो, सलमान सोबतची मैत्री तिनं जपली. आजही ती कायम आहे.

Web Title: Salman Khan Ex Girlfriend Sangeeta Bijlani Gets Attacked by Birds Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.