संतापला ‘डॅड’ सैफ अली खान; लेकीच्या बॉलिवूड डेब्यूला माझा विरोध का असेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2017 15:38 IST2017-06-20T10:08:16+5:302017-06-20T15:38:16+5:30

आपली लाडकी लेक सारा अली खान हिच्या  बॉलिवूड डेब्यूच्या बातमीने डॅड सैफ अली खानची चिंता वाढली, ही बातमी आम्ही ...

Sadapala 'Dad' Saif Ali Khan; Why should I oppose Leakee's Bollywood debut? | संतापला ‘डॅड’ सैफ अली खान; लेकीच्या बॉलिवूड डेब्यूला माझा विरोध का असेल?

संतापला ‘डॅड’ सैफ अली खान; लेकीच्या बॉलिवूड डेब्यूला माझा विरोध का असेल?

ली लाडकी लेक सारा अली खान हिच्या  बॉलिवूड डेब्यूच्या बातमीने डॅड सैफ अली खानची चिंता वाढली, ही बातमी आम्ही काल-परवाच तुमच्यापर्यंत पोहोचवली होती.  होय, साराने बॉलिवूडसारखे असुरक्षित क्षेत्र करिअर म्हणून निवडलेले पाहून सैफ अस्वस्थ आहे. एका मुलाखतीत सैफने साराच्या या निर्णयावर काहीशी काळजी व्यक्त केली होती.



साराच्या बॉलिवूडमधील करिअर करण्याच्या निर्णयाने मी थोडाचा नव्हर्स आहे. बॉलिवूड हे कमालीचे असुरक्षित क्षेत्र आहे, याची मला काळजी आहे. मी या क्षेत्राला कमी लेखतो आहे, असे मात्र अजिबात नाही. पण या क्षेत्रात येणाºया प्रत्येकाने बॉलिवूडमधील असुरक्षितता सहन केली आहे. अथक परिश्रम करूनही येथे यशाची कुठलीही खात्री नाही. अशास्थितीत आपल्या या क्षेत्राची निवड करावी, हे वडील म्हणून माझ्यासाठी चिंतेचा विषय आहे. तिने शिक्षण बघता, ती चांगल्या क्षेत्रात करिअर घडवू शकली असती. न्यूयॉर्कमध्ये सेटल झाली असती. पण तरिही तिने बॉलिवूडची निवड केली. हे मला अस्वस्थ करणारे आहे. अर्थात मी तिच्या निर्णयाचा आदर करतो, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला होता. पण ही बातमी सैफला जराही रूचलेली नाही. त्याने या बातमीवर संताप व्यक्त केला आहे. मी साराच्या निर्णयाविरोधात आहे, असा माझ्या बोलण्याचा अर्थ काढला जातोय. हे संतापजनक आहे. तुम्ही मुलाखत देता आणि त्यातील एका ओळीचा हवा तसा अर्थ काढला जातो, हे संतापजनक आहे, असे सैफ म्हणाला. साराच्या निर्णयाचा मी आदर करतो. मी फक्त या क्षेत्रातील असुरक्षिततेबद्दल चिंता बोलून दाखवली होती. बाप म्हणून माझी चिंता व्यर्थ नव्हती. पण माझ्या या चिंतेचा भलताच अर्थ काढला गेला, असे सैफ म्हणाला.

Web Title: Sadapala 'Dad' Saif Ali Khan; Why should I oppose Leakee's Bollywood debut?