‘मुबारकाँ’ ची रिलीज डेट जाहीर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 14:26 IST2016-09-06T08:56:33+5:302016-09-06T14:26:33+5:30

 खऱ्या आयुष्यातील ‘चाचा-भतीजा’ अर्जुन कपूर आणि अनिल कपूर ही जोडी आता आॅनस्क्रीन दिसणार आहे. ‘मुबारकाँ’ या चित्रपटात हे दोघे एकत्र ...

Release date for 'Mubarakan' ... | ‘मुबारकाँ’ ची रिलीज डेट जाहीर...

‘मुबारकाँ’ ची रिलीज डेट जाहीर...

 
ऱ्या आयुष्यातील ‘चाचा-भतीजा’ अर्जुन कपूर आणि अनिल कपूर ही जोडी आता आॅनस्क्रीन दिसणार आहे. ‘मुबारकाँ’ या चित्रपटात हे दोघे एकत्र दिसणार आहेत. नुकतीच चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

२८ जुलै २०१७ला चित्रपट रिलीज होणार असून यात अर्जुन दुहेरी भूमिका साकारणार  आहे. इलियाना डिक्रुझ आणि अथिया शेट्टी यांच्यासोबत तो रोमान्स करताना दिसणार आहे. अनीस बाझमी दिग्दर्शित हा चित्रपट मध्यंतरी चित्रपटातील हिरोईन्सच्या वादावरून चर्चेत होता.

तीन हिरोईन्स अगोदरच असतांना त्यात पुन्हा सोनाक्षी सिन्हा आणि परिणीती चोप्रा यांना घेण्याचा विचार सुरू होता. मात्र, नंतर त्या दोघींनी नकार दिल्याने त्यांना चित्रपटात घेण्यात आले नाही. एवढे स्टारकास्ट असल्याने चित्रपटात चांगलीच धम्माल येणार यात काहीच शंका नाही. 

Web Title: Release date for 'Mubarakan' ...