​‘वो रिश्ता एक दाग था ’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 17:43 IST2016-05-04T12:13:04+5:302016-05-04T17:43:04+5:30

‘वो रिश्ता एक दाग की तरह था...’, हे कुणाचे म्हणणे आहे, माहितीय? अभिनेत्री लक्ष्मी राय हिचे. आता कोणते नाते ...

'That relationship was a stain' | ​‘वो रिश्ता एक दाग था ’

​‘वो रिश्ता एक दाग था ’

ो रिश्ता एक दाग की तरह था...’, हे कुणाचे म्हणणे आहे, माहितीय? अभिनेत्री लक्ष्मी राय हिचे. आता कोणते नाते आणि कुणासोबत, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर लक्ष्मीचे नातेइआणि तेही भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेन्द्रसिंह धोनी याच्यासोबत. होय, धोनीसोबत कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते, अशी कबुली अलीकडे लक्ष्मीने एका मुलाखतीत दिलीयं. या मुलाखतीनंतर लक्ष्मी चांगलीच चर्चेत आहे. धोनी व माझ्यात जे काही होते, त्याला कुठलेही नाव दिले जाऊ शकत नाही, असे लक्ष्मीने या मुलाखतीत म्हटले. धोनीसोबतचे नाते कधीच संपले. मात्र लोक अद्यापही या नात्याबद्दल मला विचारतात. हे नाते एखाद्या डागासारखे आहे. ते फार काळ टिकणार नाही, असे मला आधीपासूनच वाटायचे. धोनीनंतर तीन-चार लोकांसोबत मी रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यावर कुणाचेही लक्ष गेले नाही. धोनीबाबत मात्र आजही लोक विचारतात. या  नात्याबद्दल बोलायला लोकांजवळ इतका फावला वेळ आणि ऊर्जा कशी, हाच प्रश्न मला कधीकधी पडतो. खरे तर, ते नाते कधीचेच संपले आहे. आम्ही आपआपल्या वाटेने पुढे निघालोयं. आता मी माझ्या करिअरवर पूर्ण फोकस करतेय, असेही लक्ष्मी म्हणाली.
साक्षीसोबतच्या लग्नाआधी धोनीचे लक्ष्मीसोबत दीर्घकाळ अफेअर होते. कथितरित्या २००८मध्ये एका पार्टीत लक्ष्मी व धोनीची भेट झाली होती. या पार्टीत क्रिकेटपटू सुरेश रैना हाही धोनीसोबत होता. अर्थात आता धोनी साक्षीचा झालायं...तेव्हा ही चर्चा पुढे वाढवायला नको...काय????

Web Title: 'That relationship was a stain'