मांजरीचा ‘हा’ फोटो शेअर केल्याने रवीना टंडनची राधे मॉँशी केली तुलना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 14:53 IST2018-05-08T09:22:47+5:302018-05-08T14:53:45+5:30

बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये एकेकाळी स्थान मिळवलेली अभिनेत्री रवीना टंडन भलेही मोठ्या पडद्यावरून गायब असली तरी, आपल्या चाहत्यांच्या ती नेहमीच ...

Raveena Tandon Radhe Maisonshi Compare by sharing the photo of the cat! | मांजरीचा ‘हा’ फोटो शेअर केल्याने रवीना टंडनची राधे मॉँशी केली तुलना!

मांजरीचा ‘हा’ फोटो शेअर केल्याने रवीना टंडनची राधे मॉँशी केली तुलना!

लिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये एकेकाळी स्थान मिळवलेली अभिनेत्री रवीना टंडन भलेही मोठ्या पडद्यावरून गायब असली तरी, आपल्या चाहत्यांच्या ती नेहमीच संपर्कात असते. रवीना तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करीत असते. तिने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो. मात्र यावेळेस रवीनाने एक पोस्ट शेअर केल्याने ती काही यूजर्सच्या निशाण्यावर आली. या पोस्टमुळे अनेकांनी तिच्यावर टीका केली. काहींनी तर तिची तुलना चक्क राधे मॉँशी केली.

रवीनाने ट्विटमध्ये लिहिले की, ‘अंदाज लावा की ही नशिबवान मांजर कोणाची असेल?’ रवीनाने मांजरीचा हा फोटो चेष्टामस्करीत पोस्ट केला. परंतु यूजर्सनी त्यास अधिकच गांभीर्याने घेतले. त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. कारण रवीनाने ज्या मांजरीचा फोटो शेअर केला होता, ती मांजर दागिन्यांनी नटलेली होती. एवढेच काय तर त्या मांजरीच्या अंगावर एक ओढणीही टाकल्याचे दिसत आहे. एका यूजरने या मांजरीला राधे मॉँची मांजर म्हटले. 



एका यूजरने रवीनाची फिरकी घेताना लिहिले की, ‘हे फनी नाही. त्या प्राण्याला एकटं सोडून दे. तिच्या नाकाला बिघडविण्याचा प्रयत्न करू नकोस. आणखी एका यूजरने रवीनाला विचारले की, ही प्राण्यांप्रती क्रूरता नाही काय? तर आणखी एका यूजने लिहिले की, ‘मला ही सोनम कपूरप्रमाणे दिसत आहे.’ काहीनी तर रवीना आणि राधे मॉँची तुलना करताना ही दोघींपैकी एकीची मांजर असावी, असे म्हटले. 

Web Title: Raveena Tandon Radhe Maisonshi Compare by sharing the photo of the cat!