रणबीर-शुजित येणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 16:55 IST2016-08-18T11:25:46+5:302016-08-18T16:55:46+5:30

 रणबीर कपूरला फुटबॉल खेळायला फार आवडते. त्यामुळे तो लवकरच आता फुटबॉल या खेळावर आधारित दिग्दर्शक शुजित सरकार यांच्या आगामी ...

Ranbir and Shujit together? | रणबीर-शुजित येणार एकत्र?

रणबीर-शुजित येणार एकत्र?

 
णबीर कपूरला फुटबॉल खेळायला फार आवडते. त्यामुळे तो लवकरच आता फुटबॉल या खेळावर आधारित दिग्दर्शक शुजित सरकार यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. रणबीर नुकताच शुजित सरकारच्या आॅफीसमध्ये गेला होता.

तिथे त्यांनी या आगामी प्रोजेक्टविषयी चर्चा केल्या. रणबीरची फिटनेस आणि त्याचे फुटबॉलप्रेम पाहता तो लवकरच या प्रोजेक्टवर लक्षकेंद्रित करणार आहे. रणबीर कपूरने दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा संजय दत्तच्या आयुष्यावरील बायोपिकलाही होकार दिला आहे.

त्यासोबतच आयुषमान खुरानासह एका फुटबॉल खेळावर आधारित चित्रपटात देखील तो दिसणार आहे. आता एवढे सगळे प्रोजेक्ट रणबीरने साईन केले आहेत. त्यांच्या तारखा तो कशा सुरळीत करणार हे काही सांगता येणार नाही.

Web Title: Ranbir and Shujit together?