Ramayan Movie: लूक टेस्ट झाली आणि शूटिंगही सुरु केली; 'रामायण'साठी 'शूर्पणखा'ची मोठी तयारी, मुंबईत आली अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 13:35 IST2026-05-12T13:33:38+5:302026-05-12T13:35:28+5:30
'रामायण'च्या पहिल्या भागाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच आता दुसऱ्या भागाचे कामही वेगाने सुरू झाले आहे. अशातच 'रामायण'चं शूटिंग करण्यासाठी शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

Ramayan Movie: लूक टेस्ट झाली आणि शूटिंगही सुरु केली; 'रामायण'साठी 'शूर्पणखा'ची मोठी तयारी, मुंबईत आली अभिनेत्री
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला 'रामायण' हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, पहिल्या भागाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच आता दुसऱ्या भागाचे (रामायण २) कामही वेगाने सुरू झाले आहे. अशातच 'रामायण'चं शूटिंग करण्यासाठी शूर्पणखाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.
'रामायण'च्या पहिल्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले असून तो दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे. दुसऱ्या भागासाठी आतापर्यंत केवळ 'रावण'ची भूमिका साकारणाऱ्या यशने शूटिंग सुरू केले होते. मात्र, आता शूर्पणखेची भूमिका साकारणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह देखील सेटवर दाखल झाली आहे. रकुलने मुंबईत आपली 'लूक टेस्ट' पूर्ण केली असून तिने काही महत्वाच्या सीन्सचं शूटिंगही सुरु केलं आहे. त्यामुळे रकुल प्रीत सिंहने या चित्रपटासाठी मोठी तयारी केल्याचं दिसतंय.
या पौराणिक महाकाव्यावर आधारित चित्रपटात कलाकारांची तगडी स्टारकास्ट आहे. रणबीर कपूर: प्रभू श्रीराम, साई पल्लवी: माता सीता. यश: रावण, सनी देओल: हनुमान, रकुल प्रीत सिंह: शूर्पणखा असे मोठे कलाकार 'रामायण' चित्रपटात झळकणार आहेत. 'रामायण'चा पहिला भाग यावर्षी अर्थात २०२६ च्या दिवाळीत रिलीज होणार आहे. याशिवाय 'रामायण'चा दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीत रिलीज होणार आहे.
सध्या २०२६ सालातील सर्वात यशस्वी चित्रपटाचा मान रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' कडे आहे, ज्याने १७५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. मात्र, 'रामायण'चे भव्य बजेट आणि त्यातील व्हीएफएक्स (VFX) पाहता, हा चित्रपट भारतीय सिनेमाचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढेल अशी चर्चा चित्रपट वर्तुळात आहे. रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या 'पती पत्नी और वो २' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असली, तरी तिने 'रामायण २'च्या शूटिंगसाठी आपला वेळ राखून ठेवला आहे.