प्रियंका चोपडाला हवीत खूपसारी मुले; पण ‘ही’ आहे समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 15:20 IST2018-02-03T09:41:49+5:302018-02-03T15:20:44+5:30

देसी गर्ल प्रियंका चोपडा सध्या बॉलिवूडपेक्षा हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये अधिक व्यस्त आहे. सध्या ती अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या सीजन-३ची शूटिंग ...

Priyanka Chopra has many children; But 'this' is the problem! | प्रियंका चोपडाला हवीत खूपसारी मुले; पण ‘ही’ आहे समस्या!

प्रियंका चोपडाला हवीत खूपसारी मुले; पण ‘ही’ आहे समस्या!

सी गर्ल प्रियंका चोपडा सध्या बॉलिवूडपेक्षा हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये अधिक व्यस्त आहे. सध्या ती अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या सीजन-३ची शूटिंग करीत आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे काही हॉलिवूडपटांच्याही आॅफर आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘क्वांटिको’च्या सेटवरील प्रियंकाचे काही फोटोज् समोर आले होते. ज्यामध्ये ती तिच्या को-स्टारसोबत किस करताना दिसत होती. असो, प्रियंकाने नुकतेच एका मॅगझीनला मुलाखत दिली असून, त्यात तिने तिच्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. त्यामुळे प्रियंका सध्या चर्चेत आहे. 

प्रियंकाने मुलाखतीदरम्यान लग्न आणि मुलांबद्दल आपली भावना बोलून दाखविली. तिने म्हटले की, लग्न आणि मुले माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठे लक्ष आहे. मी लग्न, फॅमिली आणि मुले यावर विश्वास ठेवून आहे, जर परमेश्वरांची इच्छा असेल तर मी खूपसाºया मुलांना जन्म देईल. परंतु ही इच्छा पूर्ण करण्यासाठी एक समस्या आहे. कारण हे सर्व कोणासोबत करायचे हे मला अजून माहिती नाही. पुढे बोलताना प्रियंकाने म्हटले की, ‘माझ्या परिवारातून मी लग्न करावे म्हणून अजिबातच दबाव नाही. कारण ते आजच्या युगाचा विचार करणारे आहे. मला माझे आयुष्य योग्य व्यक्तीसोबत व्यतित करायचे आहे.  

ALSO READ : प्रियंका चोपडाला हवाय ‘असा’ नवरा अन् खूपसारी मुले!

मुलाखतीत प्रियंकाने म्हटले की, ‘रोमान्स करणे मला खूप आवडते. मी लोकांना अटेन्शन देणे पसंत करते. मी बºयाच काळापासून सिंगल आहे. त्यामुळे मी सध्या यावर गंभीरपणे विचार करीत आहे. जर समोरचा स्मार्ट आणि इंटेलीजेंट नसेल तर तो मला कधीच इम्प्रेस आणि इंगेज करू शकणार नाही, असेही प्रियंकाने स्पष्ट केले. 

असो, प्रियंका सध्या ‘क्वांटिको’च्या सीजन-३ची शूटिंग करीत आहे. या मालिकेत ती एक तपास एजन्सीच्या अधिकाºयाची भूमिका बजावत आहे. याव्यतिरिक्त तिच्याकडे ‘ए किड लाइक जॅके’ आणि ‘इज नॉट इट रोमॅन्टिक’ या दोन चित्रपटांचीही आॅफर आहे. त्याव्यतिरिक्त ती बॉलिवूड प्रोजेक्टवरही सध्या काम करीत आहे. असो, प्रियंकाने ज्या पद्धतीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले, त्यावरून येत्या काळात तिच्याकडे नक्कीच तिच्या जोडीदाराबद्दलची बातमी ऐकावयास मिळू शकते. 

Web Title: Priyanka Chopra has many children; But 'this' is the problem!