​प्रमोशनसाठी चक्क राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या फोटोचा वापर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 16:42 IST2016-08-02T11:12:52+5:302016-08-02T16:42:52+5:30

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कुठल्याही स्तराला जायची निर्माता-दिग्दर्शकाची तयारी आहे, असेच म्हणायला हवे. प्रमोशनच्या नावाखाली सोशल मीडियावर मिळणाºया स्वातंत्र्यांच्या दुरूपयोगाचा एक ...

President and Prime Minister's photo use for promotion! | ​प्रमोशनसाठी चक्क राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या फोटोचा वापर!

​प्रमोशनसाठी चक्क राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या फोटोचा वापर!

त्रपटाच्या प्रमोशनसाठी कुठल्याही स्तराला जायची निर्माता-दिग्दर्शकाची तयारी आहे, असेच म्हणायला हवे. प्रमोशनच्या नावाखाली सोशल मीडियावर मिळणाºया स्वातंत्र्यांच्या दुरूपयोगाचा एक नमुना यानिमित्ताने समोर आला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चक्क राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे. ‘बार बार देखो’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नित्या मेहरा यांनी त्यांच्या टिष्ट्वटर अकाऊंटवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे. हॅशटॅग ‘काला चश्मा’ आणि हॅशटॅग ‘बार बार देखो’सोबत त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे. साहजिक हा फोटो म्हणजे नित्या मेहरा यांचा आगामी चित्रपट ‘बार बार देखो’ आणि यातील ‘काला चश्मा’ या गाण्याला प्रमोट करण्यासाठीचा फंडा आहे. ‘काला चश्मा’ने राष्ट्रपती व पंतप्रधानांनाही वेड लावले आहे, असा दावा चित्रपटाच्या पीआरने जारी केलेल्या बातमीत म्हटले आहे. डोळ्यांवर ‘काला चश्मा’चढवलेल्या पंतप्रधानांचा फोटो वारंवार रीटिष्ट्वट केला जात आहे. आहे ना कमाल!!

{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: President and Prime Minister's photo use for promotion!