"हा चित्रपट नाही, तर...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर प्रीती झिंटाची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:00 IST2025-12-17T11:57:57+5:302025-12-17T12:00:21+5:30
प्रीती झिंटाने पाहिला 'धुरंधर'! अभिनेत्रीला चित्रपट कसा वाटला? म्हणाली- "पुन्हा पाहण्याची इच्छा..."

"हा चित्रपट नाही, तर...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर प्रीती झिंटाची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाली?
Preity Zinta On Dhurandhar: सध्या सोशल मीडियासह प्रत्येकाच्या तोंडून धुरंधर या चित्रपटाचं नाव ऐकायला मिळतंय. आदित्य धर दिग्दर्शित या स्पाय थ्रिलर चित्रपटात रणवीर सिंग,अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल,आर.माधवन तसेच राकेश बेदी, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळतेय. भारत -पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरील या चित्रपटाचं दिग्दर्शन, संगीत आणि कलाकारांचा अभिनय या सगळ्यांना चाहत्यांची दाद मिळते आहे. त्यात अनेक कलाकार मंडळी चित्रपटाचं कौतुक करत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटानेही धुरंधर पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच प्रीतीने 'धुरंधर' चित्रपट पाहिला आणि तीचित्रपट आणि त्यामधील कलाकारांच्या कामाचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकली नाही. सोशल मीडियावर याबाबत भलीमोठी पोस्ट लिहून शेअर केली. अभिनेत्रीची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतेय. शिवाय या पोस्टवर धुरंधरचा दिग्दर्शक आदित्य धरने रिप्लाय देत अभिनेत्रीचे आभार मानले आहेत. अभिनेत्री प्रीती झिंटाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर धुरंधरबद्दल पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय, "आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. खूप दिवसांनंतर मी एकटीने चित्रपटगृहात सिनेमा पाहिला, आणि तोही हाऊसफुल शोमध्ये. साडेतीन तास इतक्या लवकर कसे निघून गेले, हे आमच्या लक्षातही आले नाही.हा प्रवास एखाद्या रोलर कोस्टर राईडसारखा होता आणि बऱ्याच काळानंतर असा एक अप्रतिम चित्रपट पाहण्याची ही एक उत्तम संधी होती.धुरंधर हा एक खरा आणि मनापासून बनवलेला चित्रपट आहे. मला तो पुन्हा पाहण्याची इच्छा आधीच झाली आहे."
त्यानंतर अभिनेत्री कलाकारांचं कौतुक करताना म्हणाली,"या चित्रपटातील प्रत्येक पात्र आपली छाप सोडते. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन हे सर्वच अप्रतिम आहेत.संगीत उत्कृष्ट आहे. हा केवळ एक चित्रपट नाही, तर देशाचे रक्षण करण्यासाठी संकटांना सामोरे जाणाऱ्या प्रत्येक देशभक्ताला लिहिलेले हे एक प्रेमपत्र आहे.दिग्दर्शक आदित्य धरने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखा आहे. असे कौतुगोद्गार अभिनेत्रीने काढले आहे."
दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ आहे. हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईचे नवनवीन विक्रम रचत आहे.