आयुषमान खुराना आणि संजय दत्त यांचे सिनेमे Box Office वर आमनेसामने; कोणी मारली बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:25 IST2026-05-19T13:14:53+5:302026-05-19T13:25:24+5:30

आयुषमान खुराना, रकुल प्रीत सिंग, वामिका गब्बी आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'पती पत्नी और वो २' या चित्रपटाची संजय दत्तच्या 'आखिरी सवाल' सोबत लढत आहे

pati patni aur woh do and aakhiri sawal box office collection details | आयुषमान खुराना आणि संजय दत्त यांचे सिनेमे Box Office वर आमनेसामने; कोणी मारली बाजी?

आयुषमान खुराना आणि संजय दत्त यांचे सिनेमे Box Office वर आमनेसामने; कोणी मारली बाजी?

आयुषमान खुराना, रकुल प्रीत सिंग, वामिका गब्बी आणि सारा अली खान यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'पती पत्नी और वो २' या चित्रपटाची संजय दत्तच्या 'आखिरी सवाल' सोबत लढत आहे. वीकेंडला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर 'पती पत्नी और वो २' या चित्रपटाने सोमवारीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं दिसतंय.

दुसरीकडे, याच चित्रपटासोबत प्रदर्शित झालेल्या संजय दत्तच्या 'आखिरी सवाल' या चित्रपटाची अवस्था मात्र अत्यंत बिकट झाली आहे. पहिल्या सोमवारी या चित्रपटाची कमाई आणखीनच कमी झाली आहे. 

'पती पत्नी और वो २' चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

मुदस्सर अझीझ यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाचे बजेट केवळ ₹६० कोटी आहे. साधारणपणे चित्रपटाची सोमवारची कमाई पहिल्या दिवसाच्या (ओपनिंग डे) तुलनेत ४०-४५% घसरली तरी ती चांगली मानली जाते. 

'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) रिपोर्टनुसार, चित्रपटाने चौथ्या दिवशी (सोमवारी) देशामध्ये ₹३.२५ कोटींचे नेट कलेक्शन केले आहे, तर पहिल्या दिवशी चित्रपटाने ₹४.०० कोटी कमावले होते. ४ दिवसांत चित्रपटाचे एकूण भारतीय नेट कलेक्शन ₹२०.७५ कोटी आणि ग्रॉस कलेक्शन ₹२४.८४ कोटी झाले आहे.  भारत आणि परदेश मिळून 'पती पत्नी और वो २' चे एकूण वर्ल्डवाईड कलेक्शन ₹२८.८४ कोटींवर पोहोचले आहे. 

दुसरीकडे, संजय दत्त आणि नमाशी चक्रवर्ती यांच्या 'आखिरी सवाल' या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटाची अवस्था बिकट झाली आहे. पहिल्या सोमवारी या चित्रपटाने देशभरात केवळ ₹२१ लाख कमावले. पहिल्या दिवसापासूनच खराब सुरुवात झालेल्या या चित्रपटाला वीकेंडलाही चांगली कमाई करता आली नव्हती. ४ दिवसांत 'आखिरी सवाल' चित्रपटाने भारतात केवळ ₹२.१६ कोटींचे नेट कलेक्शन आणि ₹२.५८ कोटींचे ग्रॉस कलेक्शन केले आहे.

अभिजीत मोहन वारंग यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट परदेशातही पूर्णपणे फ्लॉप ठरला असून, ४ दिवसांत परदेशातून अवघ्या ₹४० लाखांची कमाई झाली आहे. एकूणच, या चित्रपटाचे एकूण वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन केवळ ₹२.९८ कोटी झाले आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसचा विचार करता सध्या आयुषमान खुरानाने बाजी मारलेली दिसते.

Web Title : बॉक्स ऑफिस पर आयुष्मान खुराना की फिल्म ने संजय दत्त को पछाड़ा।

Web Summary : आयुष्मान खुराना की 'पति पत्नी और वो 2' ने बॉक्स ऑफिस पर संजय दत्त की 'आखिरी सवाल' को पछाड़ दिया। फिल्म ने चार दिनों में दुनिया भर में ₹28.84 करोड़ की कमाई की, जबकि दत्त की फिल्म ₹2.98 करोड़ के साथ संघर्ष कर रही है।

Web Title : Ayushmann Khurrana's film triumphs over Sanjay Dutt's at the box office.

Web Summary : Ayushmann Khurrana's 'Pati Patni Aur Woh 2' outperforms Sanjay Dutt's 'Aakhri Sawal' at the box office. The film has grossed ₹28.84 crore worldwide in four days, while Dutt's film struggles with ₹2.98 crore.