बाबो..! अभिनेत्री असिनच्या बेडरुममध्ये आहेत या अभिनेत्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 03:20 PM2021-02-04T15:20:49+5:302021-02-04T15:21:31+5:30

असिनने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

OMG ..! There are photos of this actor in actress Asin's bedroom | बाबो..! अभिनेत्री असिनच्या बेडरुममध्ये आहेत या अभिनेत्याचे फोटो

बाबो..! अभिनेत्री असिनच्या बेडरुममध्ये आहेत या अभिनेत्याचे फोटो

googlenewsNext

असिनने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. क्वीन ऑफ कॉलिवूडच्या नावाने असिनला ओळखले जाते. आमिर खानसोबत असिनने गजिनीमध्ये काम केले होते. या चित्रपटानंतर तिला सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली. २००९ साली असिनने सलमान खानसोबत 'लंडन ड्रिम्ज'मध्ये काम केले. हा सिनेमा मोठ्या पडद्यावर फारशी आपली कमाल दाखवू शकला नाही. यानंतर रेडीमध्ये असीन आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा दिसली. रेडीने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमावला. असिनने भलेही आमिरसोबत पहिला चित्रपट केला. परंतु ती आमिर नव्हे तर सलमान खानची चाहती आहे. ती सलमानची एवढी चाहती आहे की, तिने चक्‍क आपल्य बेडरूममध्ये सलमानचे पोस्टर लावले होते.


अभिनेत्री असिनने आमिर खानसोबत 'गजनी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. यानंतर असिनला हिंदी चित्रपटांमध्ये मागणी वाढली होती. मात्र तिने साउथच्या चित्रपटांना प्राधान्य दिल्याने ती खूपच कमी हिंदी चित्रपटांमध्ये झळकली.जेव्हा असिनला सलमानसोबत 'लंडन ड्रीम्स' चित्रपटाची ऑफर मिळाली होती. तेव्हा तिला यावर विश्‍वास बसत नव्हता की, आपल्या आवडत्या स्टारसोबत चित्रपट करायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी तिने लगेच होकार दिला होता.

असिनने भलेही आमिरसोबत पहिला चित्रपट केला. परंतु ती आमिर नव्हे तर सलमान खानची चाहती आहे. ती सलमानची एवढी चाहती आहे की, तिने चक्‍क आपल्य बेडरूममध्ये सलमानचे पोस्टर लावले होते.


'लंडन ड्रीम्स'चे बहुतेक शूटिंग आउटडोर झाले होते. ज्यामुळे कलाकारांना एकमेकांसोबत एकत्रित राहण्यास वेळ मिळाला होता. याप्रसंगी असिन आणि सलमान यांची चांगली मैत्री झाली होती. दरम्यान, सलमानने असिनला मुंबईत एक घरही गिफ्ट दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.


असीन २०१५ मध्ये आलेल्या ऑल इज वेल या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत शेवटची दिसली होती. त्यानंतर मात्र तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि राहुल शर्मासोबत संसार थाटला.

Web Title: OMG ..! There are photos of this actor in actress Asin's bedroom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.