सुश्मिताला ‘डासांमुळे’ महापालिकेची नोटिस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 16:17 IST2016-09-27T10:47:40+5:302016-09-27T16:17:40+5:30

डासांमुळे पसरणाऱ्या ‘डेंग्यू’, ‘मलेरिया’सारख्या रोगांना आळा बसवण्यासाठी सध्या मुंबई महानगरपालिका जोरदार प्रयत्न करत आहे. डासांची उत्पत्ती करणाऱ्या जागा शोधण्यासाठी ...

Notice of 'Municipal Corporation' due to Sushmita | सुश्मिताला ‘डासांमुळे’ महापालिकेची नोटिस

सुश्मिताला ‘डासांमुळे’ महापालिकेची नोटिस

सांमुळे पसरणाऱ्या ‘डेंग्यू’, ‘मलेरिया’सारख्या रोगांना आळा बसवण्यासाठी सध्या मुंबई महानगरपालिका जोरदार प्रयत्न करत आहे. डासांची उत्पत्ती करणाऱ्या जागा शोधण्यासाठी महापालिकेने शोध मोहिम हाती घेतली आहे.

त्यानुसार अधिकाऱ्यांनी शाहीद कपूर पाठोपाठ आता सुश्मिता सेनलादेखील नोटिस दिली आहे. सुश्मिताच्या घरापाशी डासांच्या उत्पत्तीस पोषक जागा आहे. परंतु ती घरी नसल्यामुळे अधिकाऱ्यांना कोणतीच कारवाई न करता परत जावे लागले.

सार्वजनिक स्वास्थ लक्षात घेता महापालिकेने नियमांनुसार तिला नोटिस जाहीर केली आहे. लवकरच तिने याबाबत प्रतिसाद दिला नाही तर तिच्या कार्यवाही केली जाऊ शकते तसेच दहा हजार रुपयांपर्यंत तिला दंडसुद्धा भरावा लागू शकतो.

निदान बॉलीवूड सेलिब्रेटिंनी तरी स्वच्छता पाळायला हवी. हो का नाही?

Web Title: Notice of 'Municipal Corporation' due to Sushmita