​‘खान नाही, अरोरा म्हणा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 22:09 IST2016-05-04T16:39:43+5:302016-05-04T22:09:43+5:30

मलाईका अरोरा खान आणि अरबाज खान दोघेही विभक्त झालेत, हे आपण जाणतोच.   त्यांनी एकमेकांपासून ब्रेक घेतलाय,म्हणे.. आता हा ...

'No Khan, Say Arora' | ​‘खान नाही, अरोरा म्हणा’

​‘खान नाही, अरोरा म्हणा’

ाईका अरोरा खान आणि अरबाज खान दोघेही विभक्त झालेत, हे आपण जाणतोच.   त्यांनी एकमेकांपासून ब्रेक घेतलाय,म्हणे.. आता हा ब्रेक किती काळासाठी आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण आमच्या कानी एक वेगळीच बातमी आलीयं. ती म्हणजे, मलाईकाने ‘खान’ हे  आडनाव लावायचे नाही,असा निर्णय घेतला आहे म्हणे. तशी मलाईकाने अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अलीकडे एका इव्हेंटच्या आयोजकांना तिने याबाबत आवर्जून सूचना केली. मला मलाईका अरोरा असे संबोधा, असे  तिने आयोजकांना सांगितले. आता असे का, हेही आम्हाला ठाऊक नाही. कारण मलाईका व अरबाज ब्रेकवर आहेत, एवढेच आम्हाला ठाऊक आहे !! किमान तूर्तास तरी तसेच मानून चालूया!!

Web Title: 'No Khan, Say Arora'