‘तुमसे अच्छा कौन है’मधील नैनाचा बदलला चेहरा-मोहरा, लेटेस्ट फोटो पाहून अवाक् झाले फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 16:39 IST2022-02-26T16:36:21+5:302022-02-26T16:39:56+5:30
आरती छाब्रीयाने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम सुरू केलं होतं.. ती तीन वर्षांची असतानापासून काम करत होती. इतकंच नाही तर तिने ३०० पेक्षा जास्त टीव्ही जाहिरातीत काम केलं आहे.

‘तुमसे अच्छा कौन है’मधील नैनाचा बदलला चेहरा-मोहरा, लेटेस्ट फोटो पाहून अवाक् झाले फॅन्स
गोविंदा आणि अक्षय कुमारसारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम केलेली अभिनेत्री आरती छाब्रीया तिच्या क्यूट स्माइलसाठी ओळखली जाते. ती २००२ ते २००८ पर्यंत इंडस्ट्रीमध्ये बरीच अॅक्टिव होती. आरतीने अनेक सिनेमात काम केलं आणि जाहिरातींमध्येही दिसली. ती 'खतरों के खिलाडी' सीझन ४ ची विजेतीही ठरली होती. त्यानंतर तिने लग्न केलं आणि इंडस्ट्रीपासून दूर गेली. ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे फोटो शेअर करत असते.
आरती छाब्रीयाने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम सुरू केलं होतं.. ती तीन वर्षांची असतानापासून काम करत होती. इतकंच नाही तर तिने ३०० पेक्षा जास्त टीव्ही जाहिरातीत काम केलं आहे. आरतीने मॅगी नूडल्स, पेप्सोडेंट टूथपेस्ट, फेश वॉश, अमूल अशा अनेक जाहिरातींमध्ये काम केलं.
तेच आरती २००२ मध्ये अनेक म्युझिक व्हिडीओमध्येही दिसली. 'नशा ही नशा है, हॅरी आनंद की 'चाहत' आणि अदनान सामीच्या गाण्यातून ती दिसली होती. आरतीने २००२ साली आलेल्या 'तुमसे अच्छा कौन है' सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या स्टार्ससोबत ती सिनेमात दिसली.
'लज्जा', 'आवारा पागल दिवाना', 'राजा भैया', 'पार्टनर', 'हे बेबी' आणि 'मिलेंगे-मिलेंगे' सारख्या सिनेमातील तिच्या कामाचं कौतुक केलं गेलं होतं. आरतीने हिंदीच नाही तर कन्नडा, तेलुगु आणि पंजाबी सिनेमातही काम केलं आहे. तिने ऑस्ट्रेलियातील एका टॅक्स कन्सल्टंटसोबत लग्न केलं आणि आता ती तिची फॅमिली लाइफ एन्जॉय करत आहे.