मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंतने शाहरूख खानला विचारला त्याचा पहिला पगार, त्याने दिले असे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 21:19 IST2017-12-26T15:49:58+5:302017-12-26T21:19:58+5:30

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) नुकतेच एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी कंपनीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देण्यात ...

Mukesh Ambani's younger son, Anantha, asked Shah Rukh Khan his first salary, as he had answered! | मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंतने शाहरूख खानला विचारला त्याचा पहिला पगार, त्याने दिले असे उत्तर!

मुकेश अंबानींचा लहान मुलगा अनंतने शाहरूख खानला विचारला त्याचा पहिला पगार, त्याने दिले असे उत्तर!

लायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआयएल) नुकतेच एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. ही पार्टी कंपनीला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देण्यात आली होती. या पार्टीदरम्यान अंबानी परिवाराच्या नव्या पिढीला (ईशा अंबानी, अनंत अंबानी आणि आकाश अंबानी) माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधण्यास सांगितले. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरूख खान उपस्थित होता. शाहरूख मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा चांगला मित्र असून, तो त्यांच्या प्रत्येक समारंभात आवर्जून उपस्थित असतो. यावेळेसदेखील तो न विसरता पार्टीत हजर होता. मात्र त्याला पार्टीत एका अशा अनुभवाचा सामना करावा लागला जो त्याला यापूर्वी कधीच आला नव्हता. 

वास्तविक शाहरूख या इव्हेंटचा होस्ट होता. शाहरूख व्यतिरिक्त ईशा, अनंद आणि आकाशनेही हा इव्हेंट होस्ट केला. इव्हेंटमध्ये सर्वाधिक आकर्षक बाब राहिली ती अंबानी परिवारातील मुलांसोबत शाहरूखचा चिट चॅट. शाहरूखला त्याच्या बेस्ट ह्यूमर आणि इंटेलीजेंसीसाठी ओळखले जाते. त्यामुळे शाहरूख आणि मुलांमध्ये चांगलाच फनी इंटरअ‍ॅक्शन घडून आला. यावेळी अनंत अंबानीने शाहरूखला त्याच्या आयुष्यातील पहिल्या पगाराविषयी विचारले. 



शाहरूखने अनंतच्या या प्रश्नाचे उत्तर देताना माझी पहिली सॅलरी ५० रूपये इतकी होती, असे सांगितले. तसेच अनंतला तुझी सॅलरी किती होती? असा प्रश्न विचारला. त्यावर अनंतने अतिशय चपळाईने उत्तर देताना म्हटले की, लीव इट, जर मी तुला माझी सॅलरी सांगितली तर कदाचित हे ऐकून तू अंबेरेस्मेंट होशील. 

Web Title: Mukesh Ambani's younger son, Anantha, asked Shah Rukh Khan his first salary, as he had answered!