कोणताही चित्रपट फक्त ९९ रुपयांत पाहा, जाणून घ्या, ही अनोखी ऑफर आहे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:21 IST2025-04-10T15:21:22+5:302025-04-10T15:21:45+5:30
'सिंकदर' ते 'जाट' नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट फक्त ९९ रुपयांत पाहू शकता.

कोणताही चित्रपट फक्त ९९ रुपयांत पाहा, जाणून घ्या, ही अनोखी ऑफर आहे तरी काय?
Movie Ticket Offer: सध्या अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. 'सिंकदर' (Sikandar ), 'जाट' एल2: एम्पुरान' (L2Empuraan) यासारखे चित्रपट तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहेत. हे चित्रपट पाहण्यासाठीदेखील सिनेरसिक चित्रपटगृहात मोठी गर्दी करत आहेत. चित्रपट प्रत्येकालाच पाहावा वाटतो. पण तिकिटाची किंमत जास्त असल्यामुळे अनेकजण चित्रपटगृहात जाणं टाळतात. सध्या मात्र सिनेरसिकांना एक मोठी संधी चालून आली आहे. कारण तुम्हाला तुमचा आवडता चित्रपट फक्त ९९ रुपयांत पाहायला मिळणार आहे.
भारतातील सर्वात मोठी सिनेमा साखळी पीव्हीआर आयनॉक्सने आपल्या प्रेक्षकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे. त्याचे नाव 'ब्लॉकबस्टर ट्युजडे' आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्ही आता दर मंगळवारी (Blockbuster Tuesdays) फक्त ९९-१४९ रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. ही ऑफर ८ एप्रिलपासून देशभरातील ३०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये लागू झाली आहे. IMAX, 3D, 4DX आणि ScreenX सारख्या प्रीमियम फॉरमॅटमधील चित्रपटांवर देखील सवलत असेल. याशिवाय, पीव्हीआर आयनॉक्सच्या खाद्यपदार्थांवरही विशेष ऑफर उपलब्ध असणार आहे. तुम्ही पीव्हीआर आणि आयनॉक्स वेबसाइट किंवा अॅपवरून तिकिटे बुक करू शकता. तथापि, दक्षिण भारतात तिकिटांचे दर थोडे वेगळे असू शकतात.
सिनेमागृहांकडून दिल्या जाणाऱ्या या ऑफर्सबाबत पिव्हीआरने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम खात्यावर माहिती दिली आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट फक्त ९९ रुपयांत पाहा, असं या कंपन्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
कोणकोणते चित्रपट ९९ रुपयांत पाहता येणार?
मिळालेल्या माहितीनुसार सिकंदर (Sikandar), ब्लॅक बॅग (BlackBag), प्रेझेन्स (Presence), द डिप्लोमॅट (TheDiplomat), छावा (Chhaava), स्नो व्हाइट (SnowWhite) असे नव्याने प्रदर्शित झालेले चित्रपट तुम्हाला फक्त ९९ रुपयांत पाहायला मिळणार आहे.