माध्यमांनी स्वत:च्या कामात लक्ष द्यावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 16:51 IST2016-08-18T11:21:49+5:302016-08-18T16:51:49+5:30

 अनुष्का शर्मा तिचे स्टाईल स्टेटमेंट, मते आणि भूमिका यांच्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे विराटसोबतचे नाते हा तर चर्चेचाच विषय ...

Media should focus on its own work | माध्यमांनी स्वत:च्या कामात लक्ष द्यावे

माध्यमांनी स्वत:च्या कामात लक्ष द्यावे

 
नुष्का शर्मा तिचे स्टाईल स्टेटमेंट, मते आणि भूमिका यांच्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे विराटसोबतचे नाते हा तर चर्चेचाच विषय बनतो. पण, तिला सतत प्रश्न विचारून त्रस्त करणाºया माध्यमांनाच तिने अनेक प्रश्न विचारून आणि शाब्दिक चपराकच मारली आहे.

ती म्हणते,‘ मी माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी का बोलू? भारतीय माध्यमांना एवढाही समंजसपणा नाही का की आपण कोणते प्रश्न विचारावेत आणि विचारू नये ? मी माझ्या नातेसंबंधाबाबतीत  खुप स्वतंत्र आहे. हॉलीवूडमध्ये असे होत नाही, दोघे जण डेटिंग करू लागले की लगेचच त्याची बातमी होत नाही कधीच.

याउलट, आपल्याकडे माध्यमांना स्वत:च्या कामांपेक्षा सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय चालले असते यात नाक खुपसण्याची भारी हौस दिसते. आम्ही काय घालतो? कुणासोबत डेट करतो? हे पाहिल्यापेक्षा तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्यावे एवढेच मला वाटते.’ 

Web Title: Media should focus on its own work