"जय भवानी, जय शिवाजी...", 'सिंघम ३'च्या सेटवर शिवगर्जना करत अभिनेत्याने केली शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 02:24 PM2024-05-10T14:24:26+5:302024-05-10T14:27:38+5:30

हिंदी मालिकाविश्वातील आघाडीचा चेहरा म्हणजे अभिनेता अंकित मोहन.

marathi cinema actor ankit mohan started rohit shetty singham 3 film shooting by sharing video of shivgarjana on movie set  | "जय भवानी, जय शिवाजी...", 'सिंघम ३'च्या सेटवर शिवगर्जना करत अभिनेत्याने केली शूटिंगला सुरूवात

"जय भवानी, जय शिवाजी...", 'सिंघम ३'च्या सेटवर शिवगर्जना करत अभिनेत्याने केली शूटिंगला सुरूवात

Ankit Mohan : हिंदी मालिकाविश्वातील आघाडीचा चेहरा म्हणजे अभिनेता अंकित मोहन. दरम्यान, अंकितची बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटामध्ये वर्णी लागली आहे. 'पावनखिंड' फेम अभिनेता अंकित मोहनरोहित शेट्टीच्या  'सिंघम ३' या सिनेमात झळकणार आहे. 

अशात त्याने या चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.  या व्हिडिओमध्ये अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसमोर शिवगर्जना करताना दिसत आहे. अंकित मोहन छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानतो. त्याने त्याच्या हातावर राजे असं नाव लिहत टॅटुही काढला आहे. चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याआधी तो महाराजांसमोर नतमस्तक झाला. अंकितच्या या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

अंकितने कॅप्शनमध्ये लिहलंय, ''छत्रपती शिवाजी महाराज की जय!! बस एक ही नाम , बस एक ही साथ, बस एक ही विश्वास और कोई नहीं '' असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. 

अभिनेत्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अंकितने 'रोडीज'मधून कलाविश्वात पाऊल ठेवलं होतं. अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला. अंकित दिग्पाल लांजेकरांच्या 'फर्जंद', 'पानवखिंड',  'फत्तेशिकस्त' या चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे.या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरल्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या हिंदी मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे.  स्टार प्लस या हिंदी वाहिनीवरील 'महाभारत' या मालिकेत त्याने अश्वथामाची भूमिका साकारली. तसेच झी टिव्हीवरील गाजलेली मालिका 'कुमकुम भाग्य' मध्येही तो झळकला आहे.  


त्याच्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अंकितच्या या व्हिडिओवर एक चाहता कमेंट करत म्हणतो, " तुझं महारांजाबद्दलचं प्रेम पाहून खरंच खूप भारी वाटतं". तर दुसरा एक यूजर म्हणतो, " तू पहिला कलाकार आहेस जो आपल्या चित्रपटाच्या शूटिंगची सुरूवात महाराजांच्या जयघोषाने करतो".

Web Title: marathi cinema actor ankit mohan started rohit shetty singham 3 film shooting by sharing video of shivgarjana on movie set 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.