​मम्मा करिना कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’मध्ये खरचं दिसणार का चिमुकला तैमूर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 07:32 AM2017-08-26T07:32:47+5:302017-08-26T13:02:47+5:30

प्रेग्नंसीनंतर करिना कपूरला मोठ्या पडद्यावर पाहण्यास सगळेच उत्सूक आहेत. लवकरच करिना तिचा आगामी सिनेमा ‘वीरे दी वेडिंग’चे शूटींग सुरु ...

Mamma will be seen in Kareena Kapoor's Veer The Wedding? | ​मम्मा करिना कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’मध्ये खरचं दिसणार का चिमुकला तैमूर?

​मम्मा करिना कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’मध्ये खरचं दिसणार का चिमुकला तैमूर?

googlenewsNext
रेग्नंसीनंतर करिना कपूरला मोठ्या पडद्यावर पाहण्यास सगळेच उत्सूक आहेत. लवकरच करिना तिचा आगामी सिनेमा ‘वीरे दी वेडिंग’चे शूटींग सुरु करणार आहे. याच चित्रपटाशी संबंधित एक बातमी सध्या वा-यासारखी पसरते आहे. ही बातमी काय? तर या चित्रपटात मम्मा करिनासोबत छोटा नवाब तैमूर अली खान झळकणार असल्याची. होय, ‘वीरे दी वेडिंग’मध्ये तैमूरचा गेस्ट अपिअरन्स असेल, अशी चर्चा सध्या सगळीकडे पसरली आहे. खरे तर यात फार मोठी गोष्ट नाही. कारण यापूर्वी शाहरूख खानचा मुलगा अबराम पापाच्या ‘हॅपी न्यू ईअर’मध्ये दिसला होता. अशात अबरामनंतर खरेच पुढचा क्रमांक तैमूरचा आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक आहे. होय, तैमूर मम्माच्या चित्रपटातून डेब्यू करणार, या बातमीत काहीही तथ्य नाही. करिनाच्या प्रवक्त्याने ही बातमी हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. तैमूरच्या गेस्ट अपीअरन्सची बातमी निव्वळ अफवा आहे. असे काहीही नाही,असे या प्रवक्त्याने म्हटले आहे.
चला, म्हणजे तूर्तास तैमूर बॉलिवूड डेब्यू करणार नाही. अर्थात तैमूरच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा आपल्यला सगळ्यांना असेल. करिना लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु करणार आहे. अनिल कपूरची मुगली रिया कपूर या चित्रपटाची निर्माती आहे. करिना शिवाय सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्या या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

ALSO READ : Say what? ​‘वीरे दी वेडिंग’साठी करिना कपूरने दिला होता नकार !!

 या चित्रपटात करिना कपूर सुमित व्याससोबत रोमांस करताना दिसणार असल्याचे समजते आहे. करिनाने प्रेग्नंसी आधी हा चित्रपट साईन केला होता. त्यानंतर ती मैटरनिटी लीव्हवर गेली होती. तैमूर आता 6 महिन्यांचा झाला आहे. त्यामुळे करिनाने ही कामावर परतण्याचा निर्णय घेतला आहे.‘वीरे दी वेडिंग’मध्ये ती एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. बेबो प्रॅक्टिकल तर सोनमला थोडीशी हळवी असेल. आपल्याला जे वाटते, ज्यामुळे आनंद मिळतो त्याच गोष्टी करण्यात ती विश्वास ठेवणारी मुलगी आहे.

Web Title: Mamma will be seen in Kareena Kapoor's Veer The Wedding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.