लग्नाच्या २२ व्या वाढदिवसानिमित्त Madhuri Dixit ने शेअर केला खास Video; म्हणाली, "एकत्र..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 12:03 IST2021-10-17T12:02:16+5:302021-10-17T12:03:06+5:30

Madhuri Dixit Wedding Anniversary : माधुरी दीक्षितच्या लग्नाला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं तिन शेअर केला एक खास व्हिडीओ.

Madhuri Dixit shared a special video on the occasion of her 22nd wedding anniversary; Said, "together ..." | लग्नाच्या २२ व्या वाढदिवसानिमित्त Madhuri Dixit ने शेअर केला खास Video; म्हणाली, "एकत्र..."

लग्नाच्या २२ व्या वाढदिवसानिमित्त Madhuri Dixit ने शेअर केला खास Video; म्हणाली, "एकत्र..."

ठळक मुद्देमाधुरी दीक्षितच्या लग्नाला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत.

माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) लग्नाला २२ वर्षे पूर्ण झाली आहे. १७ ऑक्टोबर १९९९ रोजी डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत तिनं लग्नगाठ बांधली होती. एकीकडे माधुरी दीक्षित ग्लॅमर इंडस्ट्रीमधून आहे तर दुसरीकडे श्रीराम नेने हे लाईमलाईटपासून दूर राहणं पसंत करतात. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्या दोघांत असलेलं बॉन्डींग दिसून येत आहे. तिनं आपल्या काही जुन्या फोटोंचा एक व्हिडीओ तयार केला आहे. तसंच हा एकत्र केलेला २२ वर्षांचा जादुई प्रवास असल्याचं तिनं म्हटलंय.

माधुरीनं यापूर्वी आपल्या लग्नाचा एक किस्सा मुलाखतीदरम्यान सांगितला होता. "आमच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये त्यांनी चित्रपट क्षेत्रातील कोणत्याही स्टार्सना ओळखता आलं नव्हतं. त्यांनी केवळ एकाच अभिनेत्याला ओळखलं होतं आणि ते म्हणजे अमिताभ बच्चन. आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये त्यांनी अमर अकबर अँथनी हा चित्रपट पाहिला होता. मी या चेहऱ्याला ओळखतो असं त्यांनी मला सांगितलं. त्यांचा चित्रपट पाहिल्यामुळे तुम्ही त्यांना ओळखता असं सांगितलं," असा खुलासा माधुरीनं मुलाखतीदरम्यान केला.


माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांना दोन मुलं आहेत. आरिन आणि रयान अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. आरिननं याच वर्षी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि तर रयान १६ वर्षांचा आहे. वर्कफ्रन्टबद्दल सांगायचं झालं तर माधुरी दीक्षित नुकतीच डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवाने ३ मध्ये दिसली गोती. आता लवकरच ती डिजिटल डेब्यूही करणार आहे. फाईंडिंग अनामिका असं तिच्या सीरिजचं नाव असून ती नेटफ्लिक्सवर रिलिज होणार आहे.

Web Title: Madhuri Dixit shared a special video on the occasion of her 22nd wedding anniversary; Said, "together ..."