रिसेप्शनसाठी हॉटेलमध्ये पोहोचले विराट कोहली-अनुष्का शर्मा; सिम्पल ड्रेसमध्ये झाले स्पॉट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 19:59 IST2017-12-26T14:29:24+5:302017-12-26T19:59:40+5:30

मुंबई येथील एका आलिशान हॉटेलमध्ये विरूष्काच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार असून, त्यासाठी नवदाम्पत्य हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. वाचा सविस्तर!

Kohli reached the hotel for reception; Anushka Sharma; Simple dress got spot! | रिसेप्शनसाठी हॉटेलमध्ये पोहोचले विराट कोहली-अनुष्का शर्मा; सिम्पल ड्रेसमध्ये झाले स्पॉट!

रिसेप्शनसाठी हॉटेलमध्ये पोहोचले विराट कोहली-अनुष्का शर्मा; सिम्पल ड्रेसमध्ये झाले स्पॉट!

ंबई, परेल येथील सेंट रेगिस हॉटेलमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांच्या लग्नाचा ग्रॅण्ड रिसेप्शन सोहळा होत असून, सोहळ्यासाठी दोघेही हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. हॉटेलमध्ये जातानाचे विरूष्काचे काही फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये दोघेही अतिशय फॉर्मल ड्रेसमध्ये बघावयास मिळत आहेत. यावेळी अनुष्काने डेनिम जंपसूट परिधान केला असून, विराट ब्लॅक टीशर्ट आणि ग्रे पॅण्टमध्ये दिसत आहे. दरम्यान, रिसेप्शनस्थळी रात्री ८.३० वाजेपासून पाहुणे येण्यास सुरुवात होणार आहे. 

रिपोर्टनुसार, विरूष्काच्या या रिसेप्शन सोहळ्यास बॉलिवूडसह क्रिकेटजगतातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत. तसेच राजकीय नेतेही या सोहळ्याला हजेरी लावतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. या रिसेप्शनमध्ये टीम इंडियासह बीसीसीआयचे काही आॅफिशियल अधिकारी सहभागी होतील. त्याचबरोबर बॉलिवूड लिजेंड अमिताभ बच्चन यांच्यासह सलमान, शाहरूख आणि आमिर खान सहभागी होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, जहीर खान, वीरेंद्र सेहवाग, आशीष नेहरा यांच्यासह अनेक आजी-माजी खेळाडू उपस्थित राहणार आहेत. 
 

दरम्यान, दिल्ली येथे झालेल्या रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यामुळे राज्यातील अनेक बडे नेते या रिसेप्शन सोहळ्याला उपस्थित राहतील अशी चर्चा आहे. सूत्रानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सोहळ्याचे निमंत्रण दिले असून, ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या ११ डिसेंबर रोजी विरूष्काने इटली येथे लग्न केले होते. त्यानंतर दिल्ली येथे ग्रॅण्ड रिसेप्शन दिले होते. आता मुंबई येथे मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचे आयोजन केले आहे. 

Web Title: Kohli reached the hotel for reception; Anushka Sharma; Simple dress got spot!