‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगदरम्यान कॅटरिना कैफचा दिसला घायाळ करणारा लूक, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 19:02 IST2017-10-25T13:23:33+5:302017-10-25T19:02:23+5:30

दबंगस्टार सलमान खान याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील अभिनेत्री कॅटरिना कैफचे काही हॉट फोटो समोर ...

Katrina Kaif looks shocked at the shooting of 'Tiger Zinda Hai', see photo! | ‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगदरम्यान कॅटरिना कैफचा दिसला घायाळ करणारा लूक, पहा फोटो!

‘टायगर जिंदा है’च्या शूटिंगदरम्यान कॅटरिना कैफचा दिसला घायाळ करणारा लूक, पहा फोटो!

ंगस्टार सलमान खान याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील अभिनेत्री कॅटरिना कैफचे काही हॉट फोटो समोर आले आहेत. कॅटचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वाºयासारखे व्हायरल होत असून, त्यात ती खूपच हॉट दिसत आहे. कॅटचे हे फोटो चित्रपटाच्या शूटिंगच्या अखेरच्या दिवसांमधील असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या चित्रपटाची शूटिंग ग्रीस येथे सुरू आहे. 

बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, ‘टायगर जिंदा है’च्या अंतिम शूट दरम्यान कॅट खूपच हॉट आणि सेक्सी दिसत होती. फोटोमध्ये कॅटने हिरव्या रंगाचे शॉर्ट आणि जॅकेट घातले होते. फोटो बघून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे कॅटरिना कोण्यातरी गाण्यावर डान्सची प्रॅक्टिस करीत असावी. कारण कॅटचा हा लूक घायाळ करणारा असून, त्यामध्ये दिसत असलेला जलवा प्रेक्षकांना वेड लावेल यात शंका नाही. 



दरम्यान ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट सलमान खानच्या २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’ चित्रपटाचा दुसरा भाग आहे. या भागात ‘एक था टायगर’ची पुढची स्टोरी दाखविण्यात येणार आहे. या भागातही सलमान आणि कॅटरिना जासूसची भूमिका साकारताना दिसणार आहेत. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनरअंतर्गत केली जात आहे. या अगोदर सलमान खानने ‘टायगर जिंदा है’चे पोस्टर रिलीज करून चाहत्यांना दिवाळी गिफ्ट दिले होते. 

Web Title: Katrina Kaif looks shocked at the shooting of 'Tiger Zinda Hai', see photo!