‘आँखे २’ मधून जॉनला वगळले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 10:05 IST2016-05-05T04:35:18+5:302016-05-05T10:05:18+5:30

 २००२ मध्ये रिलीज झालेला ‘आँखे’ चित्रपट उत्तम कथानक, अभिनय, सादरीकरण यांच्यामुळे तुफान हिट झाला होता. यात परेश रावळ, अक्षय ...

John dropped out of 'Eyes 2'? | ‘आँखे २’ मधून जॉनला वगळले?

‘आँखे २’ मधून जॉनला वगळले?

 
००२ मध्ये रिलीज झालेला ‘आँखे’ चित्रपट उत्तम कथानक, अभिनय, सादरीकरण यांच्यामुळे तुफान हिट झाला होता. यात परेश रावळ, अक्षय कुमार, अर्जुन रामपाल या तिघांनी अंध व्यक्तींचा अभिनय करून कथेला उत्तम वळण दिले होते.

‘वेलकम’ चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बाझमी हेच आता पुन्हा चित्रपटाचा सिक्वेल काढण्याचा विचार करत आहेत. वेलकम बॅक मध्ये अनीस बाझमी सोबत जॉनने काम केले म्हणून त्याला आताही त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे.

पण, त्याच्या दुखापतीमुळे अगोदरच त्याने घेऊन ठेवलेल्या चित्रपटांच्या शुटिंगच्या तारखांना वेळ झाला आहे. ‘फोर्स २’ चे त्याचे शूटिंग अद्याप बाकी आहे. जॉनने त्याची फीस वाढवून १२ कोटी केली असून निर्माता गौरंग दोशी ती देऊ शकणार नाही म्हणूनही तो हा चित्रपट साकारण्यास तयार नाही.

अनीस तरीही जॉनसोबत जुळवाजुळवीचे प्रयत्न करत असून त्याची फीस कमी करण्यास सांगत आहे. यात काही बदल करण्यात आले असून अनिल क पूर आणि कॅटरिना कैफ यांना यात नवी एन्ट्री म्हणून घेण्यात आले आहे. 

Web Title: John dropped out of 'Eyes 2'?