​फवाद खानसोबत जेनिफर विंगेट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2016 11:27 IST2016-06-29T05:38:17+5:302016-06-29T11:27:51+5:30

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ फेम दिग्दर्शिका झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात जेनिफर विंगेट बॉलीवूडमध्ये यावेळी यशस्वी पदार्पण करणार असे संकेत ...

Jennifer Winget with Fawad Khan? | ​फवाद खानसोबत जेनिफर विंगेट?

​फवाद खानसोबत जेनिफर विंगेट?

िंदगी ना मिलेगी दोबारा’ फेम दिग्दर्शिका झोया अख्तरच्या आगामी चित्रपटात जेनिफर विंगेट बॉलीवूडमध्ये यावेळी यशस्वी पदार्पण करणार असे संकेत मिळत आहेत.

यशस्वी यामुळे की, तिने यापूर्वी कुणाल कोहली दिग्दर्शित ‘फिर से...’ या चित्रपटात काम केलेले आहे; परंतु कथा चोरल्याच्या आरोपामुळे कोर्टाने चित्रपट प्रदर्शित करण्यास मनाई केली होती.

म्हणून फवाद खानसोबत ती या अद्याप नाव न ठरलेल्या चित्रपटात दिसणार अशी जोरदार चर्चा आहे. ‘दिल धडकने दो’नंतर झोया कोणता चित्रपट हाती घेते याकडे सर्वांचे लक्ष होते.

फवाद खान आणि जेनिफर विंगेट अशा जोडीचे नाव समोर आले तेव्हा तर चर्चा होणारच. याबाबत कोणतेही अधिकृत घोषणा जरी झाली नसली तरी इन्स्टाग्रामवर तिने अप्रत्यक्षरीत्या याला दुजोरा दिला आहे.

तिने लिहिले, ‘तुम्ही माझ्याबाबतीत काही अफवा ऐकल्या? काय सांगता त्यामध्ये तथ्यदेखील असू शकते. कदाचित आता वेळ आली आहे.’ चित्रपटात रणवीर सिंगसुद्धा असणार आहे.

 

Web Title: Jennifer Winget with Fawad Khan?