जॅकलीन म्हणतेय,‘आयुष्य स्वच्छंद जगा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 10:32 IST2016-05-18T04:54:53+5:302016-05-18T10:32:10+5:30

 २००९ मध्ये श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस हिने ‘अल्लादीन’ मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. फार कमी वेळात जॅकलीनने स्वत:चे पाऊल खंबीरपणे ...

Jacqueline says, 'live the life free' | जॅकलीन म्हणतेय,‘आयुष्य स्वच्छंद जगा’

जॅकलीन म्हणतेय,‘आयुष्य स्वच्छंद जगा’

 
००९ मध्ये श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस हिने ‘अल्लादीन’ मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. फार कमी वेळात जॅकलीनने स्वत:चे पाऊल खंबीरपणे बॉलीवूडमध्ये रोवले. पण आता मात्र तिचा प्रामाणिक अभिनय, भक्कम पर्सनॅलिटी आणि ग्लॅमरस स्क्रीन प्रेझेन्स यांच्यामुळे तिचे बॉलीवूडमध्ये फॅन्सही आता वाढू लागले आहेत.

तिने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यातून कळतेय की, ‘तिला काही स्पोर्ट्स अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करायला आवडतात. ती आयुष्य संपूर्ण अर्थाने जगते.

स्वत:ला निसर्गासोबत एकरूप करून घेणे तिला आवडते.’ सध्या ती ‘हाऊसफुल्ल ३’ मुळे पूर्णपणे बिझी आहे. तसेच तिच्याकडे ‘फ्लार्इंग जट’ आणि ‘ढिशूम’ यामध्येही बिझी आहे. 

jacquline

creative image banner

Web Title: Jacqueline says, 'live the life free'