चार दिवसांत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने कमावले इतके कोटी! पाहा बॉक्स ऑफीस रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 01:09 PM2024-03-26T13:09:24+5:302024-03-26T13:10:41+5:30

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने ४ दिवसात किती कमाई केली? जाणून घ्या

In four days, Swatantryaveer Savarkar's Check Box Office Report earned 10 crores! | चार दिवसांत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने कमावले इतके कोटी! पाहा बॉक्स ऑफीस रिपोर्ट

चार दिवसांत 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने कमावले इतके कोटी! पाहा बॉक्स ऑफीस रिपोर्ट

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची चर्चा जोरात सुरु आहे. अनेकांनी सिनेमा पाहून कौतुक केलेलं दिसलं. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातील रणदीप हूडाच्या अभिनयाचं खुप कौतुक होतंय. रणदीपनेच सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाने कमाईच्या बाबतीत किती पैसे कमावले याची सर्वांना उत्सुकता आहे. तर पाहूया गेल्या ४ दिवसात 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची किती कमाई झाली.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा लेटेस्ट बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय. चार दिवसात 'स्वातंत्र्यवीर सावरकर'  सिनेमाने १० कोटींचा आकडा पार केलाय. पहिल्या दिवशी १ कोटी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी सिनेमाने २ कोटींहून जास्त व्यवसाय केलाय. त्यामुळे चार दिवसांची कमाई बघता 'स्वातंत्र्यवीर सावरकर'  सिनेमाने १०.९६ म्हणजेच जवळपास ११ कोटी कमावले आहेत. 

आज २६ मार्चला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची खास ऑफर आहे. आज तुम्हाला एका तिकिटासह एक मोफत तिकीटाची ऑफर मिळणार आहे. ही ऑफर फक्त आजसाठी म्हणजेच २६ मार्चपर्यंत आहे. ही ऑफर घ्यायची असेल तर तुम्हाला एक कोड देखील लागेल. तो कोड SVSBOGO आहे. या ऑफरची माहिती झी स्टुडिओ ऑफिशियलच्या इंस्टाग्राम हँडलवर पोस्टरमध्ये शेअर करण्यात आली आहे.

Web Title: In four days, Swatantryaveer Savarkar's Check Box Office Report earned 10 crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.