​‘ मैं उस तरह से फकीर हूं’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 19:43 IST2016-05-08T14:13:40+5:302016-05-08T19:43:40+5:30

 गत दोन दशकांपासून बॉलिवूडवर सत्ता गाजवणारा सुपरस्टार शाहरूख खान याला यशाचे सेलिब्रेशन आवडत नाही. ‘ मैं उस तरह से ...

'I'm a fakir like that' | ​‘ मैं उस तरह से फकीर हूं’

​‘ मैं उस तरह से फकीर हूं’

 
त दोन दशकांपासून बॉलिवूडवर सत्ता गाजवणारा सुपरस्टार शाहरूख खान याला यशाचे सेलिब्रेशन आवडत नाही. ‘ मैं उस तरह से फकीर हूं’ असे प्राजंळपणे तो सांगतो. एका मुलाखतीत शाहरूखने अगदी मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या. ‘ मैं उस तरह से फकीर हूं...या वाक्याने त्याने सुरुवात केली. मी यशाचे सेलिब्रेशन करीत नाही. तुम्ही मला सातही दिवस भेटलात तर कदाचित मी त्याच पँटमध्ये दिसेल. मला लोकांना द्यायला आवडते. मी स्वत:साठी काहीही खरेदी करीत नाही. खरे तर, मला स्वत:वर पैसा खर्च करण्याची गरजच नाही. कारण माझी स्वत:ची कुठलीही इच्छा नाही. मला माझ्या मुलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायला आवडतात. मी संगीत ऐकत नाही. त्यामुळे मी स्पीकर खरेदी केलेले नाहीत. माझ्याकडे खूप सारे शूज आहेत. पण ते सर्व शूटींगच्या माध्यमातून मला मिळाले आहेत.  मी स्वत:साठी कधीच शूज खरेदी केलेले नाहीत. कारण मी एकाच प्रकारचे शूज वापरतो. मला मोठ्या गोष्टी आवडतात. म्हणून माझ्याजवळ मोठे घर आहे, मोठे आॅफिस आहे आणि मोठे चित्रपट आहेत. माझा पैसा यावरच सर्वाधिक खर्च होतो. मी केवळ चित्रपट निर्मितीवर खर्च करतो. याव्यतिरिक्त मी कधीही रेस्टॉरंटमध्ये जेवायला जात नाही. मी घरीच जेवतो. तेही रोज एकाच प्रकारचे जेवण जेवतो. मी नवीन कपडे विकत घेत नाही. आनंद मिळावा असे माझ्याकडे आज जे काही आहे, ते पूर्वापार आहे, असे शाहरूख म्हणाला.

Web Title: 'I'm a fakir like that'