आमिर खानच्या या हिरोईनला संधी मिळेना,म्हणून आता करतेय असे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 09:56 AM2017-10-27T09:56:34+5:302017-10-27T16:02:17+5:30

बॉलिवूडचा  मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह काम करायला मिळावं अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. त्यापैकी मोजक्या अभिनेत्री अशा असतात ज्यांना ...

The heroine of Aamir Khan does not get the chance, so now that work is done | आमिर खानच्या या हिरोईनला संधी मिळेना,म्हणून आता करतेय असे काम

आमिर खानच्या या हिरोईनला संधी मिळेना,म्हणून आता करतेय असे काम

googlenewsNext
लिवूडचा  मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह काम करायला मिळावं अशी प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. त्यापैकी मोजक्या अभिनेत्री अशा असतात ज्यांना आपल्या पहिल्याच सिनेमात आमिर खानसह काम करण्याची संधी मिळते.अशीच एक अभिनेत्री जिने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसह रुपेरी पडद्यावर एंट्री मारली.'लगान' या सिनेमात तिनं साकारलेली गौरी भुवन इतकीच रसिकांना भावली.गौरी साकारणारी ही अभिनेत्री म्हणजे ग्रेसी सिंग.आशुतोष गोवारीकर यांच्या 'लगान' या सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती.त्यामुळंच भुवन आणि सिनेमातील इतर कलाकारांप्रमाणे गौरीसुद्धा रसिकांच्या मनात घर करुन गेली.लगानमुळे गौरी साकारणा-या ग्रेसी सिंगचं करियर पालटलं होतं.अजय देवगणसह 'गंगाजल' आणि संजय दत्तसह 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमात ग्रेसीने काम केलं हे दोन्ही सिनेमा सुपरहिट ठरले होते.सोबतच ग्रेसीने साकारलेल्या भूमिकाही तितक्याच हिट आणि लक्षवेधी ठरल्या.याशिवाय तिने अनिल कपूर आणि प्रिती झिंटा स्टारर 'अरमान' या सिनेमात काम केलं होतं. मात्र या निवडक सिनेमांनंतर ग्रेसीच्या सिने करिअरची गाडी रुळावरुन घसरली. एकामागून एक तिचे सिनेमा फ्लॉप झाले.तिला सिनेमात काम मिळणं कठीण झालं. मात्र करिअर सुरु ठेवण्यासाठी आणि पैसा कमावण्याकरिता तिने आपला मोर्चा रुपेरी पडद्यावरुन छोट्या पडद्याकडे वळवला. ग्रेसीसाठी छोट्या पडद्यावर काम करणं ही बाब काही नवी नाही. तिने आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती.'अमानत' मालिकेतून तिनं छोट्या पडद्यावर एंट्री मारली होती. या मालिकेत काम करत असतानाच तिने 'लगान' सिनेमासाठी स्क्रीन टेस्ट दिली आणि तिची लगानसाठी निवड झाली.यानंतर ग्रेसी सिनेमांमध्ये रमली.मात्र आता ग्रेसीला सिनेमात काम मिळेना.त्यामुळे तब्बल १३ वर्षांनंतर ग्रेसीने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं.

'संतोषी माँ' मालिकेत तिने देवीची भूमिका साकारली.आपल्याला टिपिकल सासू-सूनांच्या भांडणावर आधारित मालिकांमध्ये रस नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.त्यामुळे ग्रेसी आता छोट्या पडद्यावरच रमल्याचं पाहायला मिळतंय.छोट्या पडद्यापासून सुरु झालेला ग्रेसीचा प्रवास रुपेरी पडदा आणि मग पुन्हा रुपेरी पडद्यावरुन ती छोट्या पडद्याकडे परतली.कधी काळी आमिर खानसह स्क्रीन शेअर केलेल्या या अभिनेत्रीला काम मिळत नसल्याने छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. 

Web Title: The heroine of Aamir Khan does not get the chance, so now that work is done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.