​ फवाद बरळला, ‘बॉलीवुड किसी का बाप है क्या?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2016 12:11 IST2016-10-01T06:41:40+5:302016-10-01T12:11:40+5:30

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला भारतीयांचे अपार प्रेम मिळाले. बॉलिवूडमुळे त्याला यशाची चवही चाखायला मिळाली. पण कदाचित हे यश फवादला ...

The flurry was over, 'Is Bollywood the father of somebody?' | ​ फवाद बरळला, ‘बॉलीवुड किसी का बाप है क्या?’

​ फवाद बरळला, ‘बॉलीवुड किसी का बाप है क्या?’

किस्तानी अभिनेता फवाद खानला भारतीयांचे अपार प्रेम मिळाले. बॉलिवूडमुळे त्याला यशाची चवही चाखायला मिळाली. पण कदाचित हे यश फवादला पचवता आलेले नाही. कदाचित यशाची हवा त्याच्या डोक्यात गेलीय. पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी करण्याच्या मागणीवर फवाद जे बोलला ते याचेच दर्शक आहे. होय, पाकिस्तानी कलाकारांवर बंदी लादण्याच्या मागणीवर फवादने म्हणे मीडियासमक्ष नाराजी व्यक्त केली. नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार फवादला आहेच. पण यासाठी त्याने वापरलेले शब्द त्याच्यातील अहंकाराचा परिचय देणारे आहेत. ‘बॉलीवुड  किसी का बाप है क्या?,’असा सवाल फवादने मीडियाशी बोलताना केला. इम्पाचे अध्यक्ष आणि निर्माता टी.व्ही अग्रवाल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. फवाद खानने पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीच्या अनुषंगाने मीडियात आपली नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानी कलाकारांना होत असलेल्या विरोधावर नाराजी व्यक्त करताना ‘बॉलीवुड  किसी का बाप है क्या?’असे फवाद म्हणाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. आता फवाद भारतात राहून अशी अहंकाराची भाषा करणार असेल तर त्याला ही भाषा महागात पडणारच...  

Web Title: The flurry was over, 'Is Bollywood the father of somebody?'