नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्यांदा बनवली इंस्टाग्राम रिल, जाणून घ्या काय आहे खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 18:32 IST2021-03-25T18:32:12+5:302021-03-25T18:32:39+5:30

नुकतेच नवाजुद्दीन सिद्दीकीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

The first Instagram reel created by Nawazuddin Siddiqui, find out what the special reason is | नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्यांदा बनवली इंस्टाग्राम रिल, जाणून घ्या काय आहे खास कारण

नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्यांदा बनवली इंस्टाग्राम रिल, जाणून घ्या काय आहे खास कारण

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटासाठी तयार आहे. नुकतेच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. तो नेहमी त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगचा सेटवरील फोटो शेअर करत असतो. मात्र यावेळी काही वेगळेच पहायला मिळाले. नुकतेच त्याने एक नवीन व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यात अभिनेता त्याच्या आगामी नवीन गाण्याबद्दल सांगतो आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हा नवीन म्युझिक अल्बम २७ मार्चला रिलीज होणार आहे. नवाजुद्दीनने सोशल मीडियावर पहिल्यांदा रील बनवून शेअर केला आहे ज्यात तो नवीन गाण्याचा डायलॉग बोलताना दिसतो आहे.

या व्हिडीओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ये सूरज से भी कह दो. माझा इंस्टग्रामवर पहिला रील. संपूर्ण गाणे २७ मार्चला रिलीज होत आहे. तोपर्यंत तुम्ही या साउंडवर रील बनवा आणि काही चांगल्या रील मी माझ्या स्टोरीजमध्ये शेअर करेन.

दिग्दर्शक अरविंदर खैरा हे पंजाबमधील एक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत आणि आता ते नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत एक सर्वोत्कृष्ट गाणे घेऊन येत आहे. अरविंदर खैरामधील आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केले ज्यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, गीतकार जाणी आणि गायक-अभिनेता सुनंदा शर्मा यांच्यासमवेत हे व्हिडीओ पोस्ट केले.

अरविंदर खैरा यांचे “बारीश की जाए” हे गाणे गीतकार जाणी यांनी लिहिले आहे आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता बी प्राक यांनी स्वरसाज दिला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच डेसिमेलॉडीजच्या प्रोडक्शन्सच्या एका म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहे. बारीश की जाएचे टीझर नुकतेच यूट्यूबवर प्रसिद्ध झाले आहे. "बरीश की जाए" २७ मार्चला रिलीज होणार आहे.
 

Web Title: The first Instagram reel created by Nawazuddin Siddiqui, find out what the special reason is