भन्नाट!!​ ‘बाहुबली2’ पहिले आॅडिओ साँग ‘साहोरे बाहुबली’ आऊट ... !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 10:40 IST2017-03-27T05:10:59+5:302017-03-27T10:40:59+5:30

‘बाहुबली: दी कन्क्लुजन’चे आॅडिओ सॉन्ग ‘साहोरे बाहुबली’ रिलीज झाले आहेत. अर्थात हे तेलगू व्हर्जन आहे.

The first audio song 'Sahara Bahubali' out! | भन्नाट!!​ ‘बाहुबली2’ पहिले आॅडिओ साँग ‘साहोरे बाहुबली’ आऊट ... !

भन्नाट!!​ ‘बाहुबली2’ पहिले आॅडिओ साँग ‘साहोरे बाहुबली’ आऊट ... !

ाहुबली2’च्या ट्रेलरने लोकांना वेड लावले आहे. गेल्या उण्यापुºया दहा-बारा दिवसांत कोट्यवधी लोकांनी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे. त्यातच ‘बाहुबली2’शी संबंधित रोज नवी गोष्ट आपल्या समोर येतेच आहे. त्यामुळे आमच्यासकट तुम्हा सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचणे साहजिक आहे. आता एक आनंदाची बातमी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. होय, ही बातमी म्हणजे, ‘बाहुबली2’चे गाणे. होय, ‘बाहुबली: दी कन्क्लुजन’चे आॅडिओ सॉन्ग ‘साहोरे बाहुबली’ रिलीज झाले आहेत. अर्थात हे तेलगू व्हर्जन आहे. यात आपल्याला ऐकायला मिळणार आहे तो दलेर मेहंदी यांचा दमदार आवाज. दलेर मेहंदी यांच्यासोबत एमएम कीरावाणी आणि मौनिमा यांचे आवाजही या गाण्यात ऐकायला मिळणार आहेत. या गाण्याचे शब्द तुम्हाला कळो वा ना कळो. पण हे गाणे ऐकण्यापासून तुम्ही स्वत:ला रोखू शकणार नाही, हे मात्र खरे. एम.एम. कीरावाणी यांनी कम्पोज केलेल्या या गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.



एस.एस. राजमौली दिग्दर्शित या चित्रपटाचे एक नवे पोस्टर काल जारी करण्यात आले होते. यात अभिनेता प्रभास यौद्धा रूपात दिसला होता. प्रभासशिवाय राणा डग्गूबाती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, सत्यराज आणि राम्या कृष्णन यात मुख्य भूमिकेत आहेत. ‘बाहुबली2’ हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज केला जाणार असून, ६५०० स्क्रीन्सवर एकाचवेळी रिलीज केला जाणार आहे. हाही एकच रेकॉर्ड आहे. 

ALSO READ : bahubali-2 trailer : केवळ अदभूत! डोळे दिपवून टाकणारा प्रोमो!!

‘बाहुबली2’ २८ एप्रिलला रिलीज होणार आहे.  हा चित्रपट ‘बाहुबली: द बिगिनिंग’चा सीक्वल आहे.  बाहुबलीच्या पहिल्या भागात  कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाने प्रेक्षकांच्या मनात काहूर निर्माण केला आहे. प्रत्येकालाच या प्रश्नाचे उत्तर हवे असल्याने सिनेमाची आतुरता आता शिगेला पोहोचली आहे.  

Web Title: The first audio song 'Sahara Bahubali' out!