सलग हिट चित्रपट देऊनसुद्धा तापसी पन्नूकडे नाहीत चित्रपट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 10:30 IST2017-10-30T05:00:17+5:302017-10-30T10:30:17+5:30

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूकडे सध्या एक ही चित्रपट नाही आहे. हो, हे खरे आहे की आता तिच्याकडे एक हे ...

Filmmaker does not have a hot hit film yet? | सलग हिट चित्रपट देऊनसुद्धा तापसी पन्नूकडे नाहीत चित्रपट ?

सलग हिट चित्रपट देऊनसुद्धा तापसी पन्नूकडे नाहीत चित्रपट ?

लिवूड अभिनेत्री तापसी पन्नूकडे सध्या एक ही चित्रपट नाही आहे. हो, हे खरे आहे की आता तिच्याकडे एक हे चित्रपट नाही आहे तुम्हाला कारण माहिती आहे का ? चला आम्ही सांगतो तुम्हाला कारण 

तापसी पन्नूने याबद्दल एक खुलासा केला आहे ती म्हणाली, मी सलग हिट चित्रपट दिले आहेत पण आता माझ्याकडे एक ही चित्रपट नाही आहे कारण अजून मला आलेल्या चित्रपटांच्या ऑफरमध्ये मला एक ही स्क्रिप्ट आवडली नाही त्यामुळे आता माझ्याकडे एकही चित्रपट नाही आहे. 

तापसीने जुडवा २च्या चित्रीकरणाच्या वेळेस अनुभव सिन्हाचा चित्रपट साइन केला होता. सध्या ती त्याच चित्रपटाचे शुटिंग लखनौमध्ये करत आहे. या हा सोशल थ्रिलर चित्रपट आहे. यात तापसी वकिलाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे नाव मुल्क आहे. यात ऋषी कपूर हि दिसणार आहेत. मुल्क हा चित्रपट एक सत्य घटनेवर आधारित आहे. तापसी यात ऋषी कपूर यांच्या सुनेच्या भूमिकेत दिसणार आहे. वकिलची भूमिका साकार करण्यासाठी तापसी खूप मेहनत करताना दिसली. जॉन अब्राहिमच्या स्पॅनिश चित्रपटाच्या रिमेकमध्ये तापसी दिसणार होती. मात्र आता तिची जागा क्रिती सॅनने घेतल्याचे समजते. तापसीला या चित्रपटातून मिळणारे मानधन कमी असल्याचे वाटते म्हणून तिने हा चित्रपट नाकारला त्यानंतर यात क्रितीला घेण्यात आल्याचे समजते आहे. 

काही दिवसांपूर्वी तापसीचा जुडवा २ रिलीज झाला त्यात तापसीच्या कामाचे कौतुक झाले. या चित्रपटात ती वरूण धवन आणि जॅकलिन फर्नांडिसबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली होती. तसेच मध्यंतरी वरूण आणि त्याची ‘जुडवा2’ को-स्टार तापसी पन्नू या दोघांची जवळीक वाढल्याची बातमी होती. नताशा यामुळे अपसेट असल्याचेही ऐकीवात आले होते. ताजी चर्चा खरी मानाल तर वरूण व नताशात काहीतरी बिनसले आहे. होय, कारण असे नसते तर नुकताच झालेल्या दिवाळींच्या पार्ट्यांमध्ये वरूण एकटा दिसला नसता. आधी वरूण व नताशा सर्रास एकत्र दिसत. अलीकडच्या बहुतेक सर्वच पार्ट्यांना दोघे एकत्र जात. दिवाळीच्या दिवसांत वरूणने अनेकांच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. पण या पार्टीमध्ये नताशा त्याच्यासोबत नव्हती.

Web Title: Filmmaker does not have a hot hit film yet?