तुम्हाला माहिती आहे का, 21 वर्षांपूर्वी शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर बनला होता रेमो डिसोझा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 21:00 IST2018-12-26T21:00:00+5:302018-12-26T21:00:00+5:30

नुकताच शाहरुख खानचा झिरो सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तरीही शाहरुख, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ अजूनही सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत.

Do you know, 21 years ago, shahrukh khan background dancer was made by Remo D'Souza | तुम्हाला माहिती आहे का, 21 वर्षांपूर्वी शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर बनला होता रेमो डिसोझा

तुम्हाला माहिती आहे का, 21 वर्षांपूर्वी शाहरुख खानचा बॅकग्राऊंड डान्सर बनला होता रेमो डिसोझा

ठळक मुद्देशाहरुखने आपल्या खास अंदाजात मंचावर येताच प्रेक्षकांची मनं जिंकली

नुकताच शाहरुख खानचा झिरो सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तरीही शाहरुख, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ अजूनही सिनेमाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. नुकतीच झिरो सिनेमाची टीम ‘डान्स+4’च्या मंचावर आली होती. शाहरुखने आपल्या खास अंदाजात मंचावर येताच प्रेक्षकांची मनं जिंकली.  

या कार्यक्रमात परदेस चित्रपटातील ‘मेरी मेहबूबा’ या गाण्यावर नृत्य सादर केले. त्यानंतर शाहरूख व्यासपीठावर आला आणि त्याने या गाण्यासंबंधी एक रंजक किस्सा सांगितला. शाहरूख म्हणाला की हे गाणे त्याच्या सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक आहे. शाहरूखने सांगितले की, त्यावेळी या गाण्यात बॅकग्राऊंडला सडपातळ तरूण मुलगा मागे नाचत होता, पण मला त्या मुलाचे नावही तेव्हा ठाऊक नव्हते. मात्र पुढे याच बारक्या मुलाने संपूर्ण बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवले. तो दुसरा तिसरा कोणी नसून आजघडीला भारतातील एक सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा आहे. रेमोने ऐवढे यश कला आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे. ऐवढेच नाही तर शाहरुखने रेमोच्या मागे बॅकग्राऊंड डान्सर म्हणून डान्स करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्ण देखील केली. झिरो सिनेमातील इश्कबाजी या गाण्यावार रेमोने शाहरुख आणि सलमान सोबत डान्सदेखील केला आहे.  


शाहरूखच्या या वागण्यामुळे रेमो काहीसा भारावून गेला होता आणि तो म्हणाला, “मला काय बोलावं, तेच सुचत नाही आहे आणि माझ्या जीवनातील हा सर्वोत्तम क्षण आहे.”

Web Title: Do you know, 21 years ago, shahrukh khan background dancer was made by Remo D'Souza