‘सुल्तान’च्या दिग्दर्शकाला मिळाली सुल्ताना

By Admin | Updated: June 25, 2016 01:49 IST2016-06-25T01:49:35+5:302016-06-25T01:49:35+5:30

‘सु ल्तान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास झफर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याचे संकेत आहेत. अली सध्या कॉस्ट्युम स्टायलिस्ट लीपाक्षी एलवाडीला डेट करत असून दोघेही

The director of 'Sultan' got Sultana | ‘सुल्तान’च्या दिग्दर्शकाला मिळाली सुल्ताना

‘सुल्तान’च्या दिग्दर्शकाला मिळाली सुल्ताना

‘सु ल्तान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास झफर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकण्याचे संकेत आहेत. अली सध्या कॉस्ट्युम स्टायलिस्ट लीपाक्षी एलवाडीला डेट करत असून दोघेही रिलेशनशिपबाबत खूप सिरियस असल्याचे बोलले जातेय. पुढच्या वर्षी दोघे लग्न करण्याचा विचार करत आहे, असे त्यांच्या जवळचे मित्रमंडळी सांगत आहेत. लिपाक्षी जेव्हा ‘बेवकुफियां’ सिनेमासाठी यशराज बॅनरसाठी काम करायची तेव्हा तिची आणि अलीची भेट झाली. तेव्हापासून दोघांचे प्रेम जुळले. तसेच मागच्या महिन्यात जेव्हा ‘सुल्तान’च्या एका गाण्याची शूटिंग बुडापेस्ट येथे झाली तेव्हा लिपाक्षीदेखील त्यांच्यासोबत होती. अलीला सध्या त्याच्या फिल्म करिअरवरच सर्व लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे दोघांनी रिलेशनशिपची अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु लवकरच दोघे चाहत्यांना सुखद धक्का देणार असल्याची चर्चा आहे. या नव्या ‘बी-टाऊन’ कपलला आमच्याकडून शुभेच्छा!

Web Title: The director of 'Sultan' got Sultana