इतक्या पैस्यांचं काय करशील, शॅम्पू तेल विकत घे, सेल्फीमुळे जबरदस्त ट्रोल होते Deepika Padukone

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 03:00 PM2022-01-13T15:00:01+5:302022-01-13T15:03:37+5:30

दीपिकाने (Deepika Padukone) तिचा एक सेल्फी शेअर केला आहे. हा सेल्फी पाहून चाहत्यांचीच बोलती बंद झाली आहे. एरव्ही स्टायलिश लूकमध्ये फोटो शेअर करणारी दीपिकाला झाले तरी काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

Deepika Padukone's hair flip goes MISERABLY WRONG; netizens say 'Itne paise kaha rakhogi shampoo aur tel kharid Lo | इतक्या पैस्यांचं काय करशील, शॅम्पू तेल विकत घे, सेल्फीमुळे जबरदस्त ट्रोल होते Deepika Padukone

इतक्या पैस्यांचं काय करशील, शॅम्पू तेल विकत घे, सेल्फीमुळे जबरदस्त ट्रोल होते Deepika Padukone

googlenewsNext

बॉलीवुडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पादुकोण या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. सेलिब्रिटी मंडळी कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. सोशल मीडियावर आपल्या सिनेमांच्या प्रमोशनपासून ते स्वतःच्या जीवनातील गोष्टींची माहिती सेलिब्रिटी सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या जीवनातील काही सुखद आणि खास क्षणसुद्धा रसिकांसह शेअर करतात.

 

सोशल मीडियापैकी इन्स्टाग्राम हे अनेक सेलिब्रिटींचं आवडतं. इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटी अॅक्टिव्ह असून ते इथे आपले फोटो, व्हिडिओ आणि जीवनातील क्षण शेअर करत असतात. दीपिकासुद्धा  सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. त्यामुळे तिची छोट्यातली छोटी अपडेट शेअर करताच रसिकांपर्यंत पोहचते. 

 

नुकतेच दीपिकाने तिचा एक सेल्फी शेअर केला आहे. हा सेल्फी पाहून चाहत्यांचीच बोलती बंद झाली आहे. एरव्ही स्टायलिश लूकमध्ये फोटो शेअर करणारी दीपिकाला झाले तरी काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तिचा अवतार पाहून चाहते तिची खिल्ली उडवत आहेत. नेटकरी कमेंट्स करत वेगवेगळ्या गोष्टी तिला करायला सांगत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'तुझ्याकडे एवढे पैसे आहेत. तु शॅम्पू आणि तेल विकत घे' तर दुसऱ्याने लिहिले, 'अंघोळ करून घे थंडी नाहिये एवढी'.  दीपिकाच्या एका चाहत्याने कमेंट केली, 'तु केसांना एकदा साबण लावून पाहा.'

दीपिकाला ट्रोल करण्याची ही काय पहिली वेळ नाही.याआधीसुद्धा तिला तिच्या अतरंगी स्टाईलमुळे ट्रोल केले गेले होते. मात्र आता या ट्रोलिंगचा तिलाही अजिबात फरक पडत नाही. सोशल मीडियावर दिवसेंदिवस तिची चर्चा होते त्याला कारणही तिची खास स्टाईलच असते. त्यामुळे हा सेल्फीसुद्धा पाहून चाहत्यांना हसू आवरणं अशक्य होत आहे.  

नुकतीच दीपिका कबीर खानच्या '83' सिनेमात झळकली होती. तिच्या अभिनयाप्रमाणे तिच्या लूकचीही प्रचंड चर्चा झाली. आता आगामी काळात दीपिका 'फाइटर' आणि द इंटर्न' सिनेमात झळकणार आहे. 

Web Title: Deepika Padukone's hair flip goes MISERABLY WRONG; netizens say 'Itne paise kaha rakhogi shampoo aur tel kharid Lo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.