वर्कआऊट करता करता दीपिका पादुकोणला आठवला ‘लुंगी डान्स’, मग केले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 16:00 IST2020-03-01T15:30:00+5:302020-03-01T16:00:13+5:30

मजेशीर व्हिडीओ

deepika padukone workout with trainer yasmin karachiwala video viral-ram | वर्कआऊट करता करता दीपिका पादुकोणला आठवला ‘लुंगी डान्स’, मग केले असे काही

वर्कआऊट करता करता दीपिका पादुकोणला आठवला ‘लुंगी डान्स’, मग केले असे काही

ठळक मुद्देलवकरच दीपिका पती रणवीर सिंहसोबत ‘83’ या चित्रपटात झळकणार आहे.

34 वर्षांची दीपिका पादुकोण फिटनेसबद्दल अतिशय जागरूक आहे. इतकी की, एक दिवसही ती जिम चुकवत नाही. मलायका अरोरा, जान्हवी कपूर यांच्यासारखी जिमबाहेर स्पॉट होत नसली तरी दीपिका न चुकता वर्कआऊट करते. तिचा असाच एक वर्कआऊटचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ इतका मजेशीर आहे की, तो बघून चाहतेही क्रेजी झाले आहेत. होय, सीरिअसली वर्कआऊट करता करता दीपिकाचे मूड अचानक बदलते आणि मग वर्कआऊट सोडून ती डान्स करू लागले आणि यानंतर खो-खो हसत सुटते. व्हिडीओत दीपिकासोबत तिची ट्रेनर यास्मीन कराचीवाला ही सुद्धा व्हिडीओत दिसतेय. 


दीपिकाचा ‘छपाक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अपेक्षेनुसार कमाई केली नाही. पण चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचे मात्र सर्वांनीच कौतुक केले.  लवकरच दीपिका पती रणवीर सिंहसोबत ‘83’ या चित्रपटात झळकणार आहे.

तसेच ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटात ती ऋषी कपूरसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापाठोपाठ दीपिका संजय लीला भन्साळींच्या एका चित्रपटात दिसणार असल्याचीही चर्चा आहे. दीपिका आणि संजय लीला भन्साळीच्या जोडीने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा ही जोडी एका नव्या चित्रपटाच्या तयारीला लागली असल्याची चर्चा रंगली आहे. दीपिकाला नुकतेच संजय लीला भन्साळीच्या ऑफिस बाहेर पाहाण्यात आले. त्यामुळे संजय आणि दीपिका हे लवकरच त्यांच्या नव्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: deepika padukone workout with trainer yasmin karachiwala video viral-ram