का चिडला अभिषेक ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2016 10:06 IST2016-05-20T04:36:10+5:302016-05-20T10:06:10+5:30

अमिताभ बच्चन यांना जरी आपण ‘अँग्री यंग मॅन’ म्हणत असलो तरी आपण अभिषेक बच्चनला मात्र ‘कुल बॉय’ म्हणूनच ओळखतो. ...

Chidla Abhishek? | का चिडला अभिषेक ?

का चिडला अभिषेक ?

िताभ बच्चन यांना जरी आपण ‘अँग्री यंग मॅन’ म्हणत असलो तरी आपण अभिषेक बच्चनला मात्र ‘कुल बॉय’ म्हणूनच ओळखतो. पण, नुकत्याच पार पडलेल्या ‘सरबजीत’ च्या रेड कार्पेट शोवर तर असे काहीच जाणवले नाही.

उलट, असे काय झाले ते माहित नाही पण, अभिषेक बच्चन ऐश्वर्यावर भयानक चिडला होता. यावेळी ऐश्वर्याचे आईवडील वृंदा आणि कृष्णराज रॉय, भाऊ आदित्य देखील उपस्थित होता. बच्चन परिवार आणि रॉय फॅमिली ऐश्वर्याचे सरबजीत विषयीचे यश यांचे कौतुक केले.

माध्यमांनी ज्यावेळी ऐशचे फोटो काढण्यास सुरूवात केली तेव्हा तो रागाने लालबुंद झाला आणि म्हणाला,‘ काढा मग हिचेच फोटो.. मी कशाला हवाय...? ’

त्यानंतर राग शांत झाल्यावर तो म्हणाला, ‘ कोणत्याही कलाकारासाठी प्रामाणिकपणे आणि भयमुक्त होऊन काम करणे म्हणजे खुप कठीण असते. पण, माझी पत्नी खुपच शूर आणि स्वाभिमानी आहे त्यामुळे मला तिचा अभिमान वाटतोय.’ 

abhishek bacchan

Web Title: Chidla Abhishek?