"सच्चे मित्र से बडा कोई धन नहीं...", 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याची डोळे पाणावणारी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 16:17 IST2025-02-22T16:14:08+5:302025-02-22T16:17:01+5:30
नुकतीच अभिनेता विनीत सिंहने सोशल मीडियावर 'छावा' च्यानिमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.

"सच्चे मित्र से बडा कोई धन नहीं...", 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याची डोळे पाणावणारी पोस्ट
Vineet Kumar Singh: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची मुख्य भूमिका असलेला 'छावा' हा चित्रपट सध्या जगभरात गाजतो आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. या कलाकारांच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होतंय. याशिवाय 'छावा' मध्ये कवी कलश हे पात्र साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) सुद्धा या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराज यांचे जवळचे मित्र होते. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची निर्घृण हत्या केली होती. नुकतीच विनीत सिंहने सोशल मीडियावर 'छावा' साठी खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.
अभिनेता विनीत कुमारने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर छावाच्या निमित्ताने एक लक्षवेधी शेअर केली आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्याने छत्रपती संभाजी महाराज आणि कवि कलश यांच्या मैत्रीच्या नात्याचं वर्णन अतिशय सुंदर शब्दांत केलं आहे. "प्रभु अगर प्रसन्न हैं, तो क्या लाज - समाज, कवि कलश के मीत हैं, संभाजी शिवराज..., सच्चे मित्र से बड़ा कोई धन नहीं! हर हर महादेव...!" असं कॅप्शन विनीतने या पोस्टला दिलं आहे. त्याच्या ही पोस्ट पाहून चाहते सुद्धा भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटाने आतापर्यंत भारतात २०० कोटींहून आणि जगभरात ३०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाचे सगळेच शो हाउसफुल्ल आहेत. 'छावा' चित्रपटामध्येविकी कौशलसह अभिनेत्री रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह तसेच दिव्या दत्ता, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम आणि संतोष जुवेकर यांसारख्या तगड्या कलाकारांची फळी पहायला मिळते आहे.