"भीतीने एका कोपऱ्यात उभी राहून मी रडत होते... ", सैफ अली खानवरील हल्ल्याआधी बहीण सोहाच्या घरी घडलेली भयानक घटना, स्वत:च केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:45 IST2026-05-12T11:42:08+5:302026-05-12T11:45:02+5:30
पहाटे ४ वाजता अज्ञात व्यक्ती घरात घुसला अन्...; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली- "मी एका कोपऱ्यात उभी राहून मी रडत होते..."

"भीतीने एका कोपऱ्यात उभी राहून मी रडत होते... ", सैफ अली खानवरील हल्ल्याआधी बहीण सोहाच्या घरी घडलेली भयानक घटना, स्वत:च केला खुलासा
Soha Ali Khan: मुंबईत मागील काही वर्षांपासून कलाकारांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. जानेवारी २०२५ मध्ये अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला होता. वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात घुसून एक अज्ञाताने चाकूने हल्ला केला होता, ज्यात तो जखमी झाला. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ माजली.सैफ गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. अशातच सैफची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खानने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या एका भयानक घटनेची आठवण सांगितली आहे.
दरम्यान,सोहाने खुलासा केला की सैफच्या घरी चोरी होण्यापूर्वी तिच्या घरीही चोरी झाली होती. ही घटना २०११ साली घडली. त्यावेळी ती मुंबईतील तिच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत होती. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका चोराने तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे ती पूर्णपणे घाबरून गेली. सोहाने भावूक होऊन सांगितले की,"भीतीने एका कोपऱ्यात उभी राहून मी रडत होते आणि काय करावं हे तिला सुचत नव्हते."सोहा अली खानने नुकतेच युवासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये त्या घटनेचा उल्लेख करत सांगितलं, कदाचित मी धाडसी व्यक्ती नसेन. जेव्हा कधी असं काही अचानक घडतं, तेव्हा माझं मन सुन्न होतं आणि काम करणं थांबतं."
मग सोहाने सांगितले की त्यांचं घर रस्त्याच्या अगदी जवळ असल्यामुळे तिथे पोहोचणे सोपं होतं."एका रात्री, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास, अचानक बाहेरून काही विचित्र आणि संशयास्पद आवाज ऐकू आले.जेव्हा कुणाल नीट पाहण्यासाठी गेला, तेव्हा त्याला एक अज्ञात व्यक्ती घरात शिरण्याचा प्रयत्न करताना दिसला. कुणाल त्याच्या जवळ जाताच, चोराने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणालने चोराला रंगेहाथ पकडले. नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं."
वर्कफ्रंट
सोहा अली खान 'दिल मांगे मोअर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र,'रंग दे बसंती'चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली.'साहेब बिवी और गॅंगस्टार','मुंबई मेरी जान'या चित्रपटांणमध्येही तिने काम केलं आहे. त्यानंतर बराच काळ ती सिनेविश्वापासून दूर होती. अलिकडेच ती 'छोरी-२' चित्रपटात दिसली.