साडेआठ महिन्यांची गरोदर असतानाही काम करत होती 'ही' अभिनेत्री, सेटवरच लेबर पेन सुरू झालं अन्...; सांगितला 'तो' अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 10:58 IST2026-04-23T10:56:27+5:302026-04-23T10:58:00+5:30
ग्लॅमर इंडस्ट्रीतील झगमगाट सगळ्यांनाच दिसतो मात्र कलाकारांची पडद्यामागची मेहनत कोणाला माहित नसते.

साडेआठ महिन्यांची गरोदर असतानाही काम करत होती 'ही' अभिनेत्री, सेटवरच लेबर पेन सुरू झालं अन्...; सांगितला 'तो' अनुभव
Neha Dhupia: ग्लॅमर इंडस्ट्रीतील झगमगाट सगळ्यांनाच दिसतो मात्र कलाकारांची पडद्यामागची मेहनत कोणाला माहित नसते. पुरुषांच्या तुलनेत महिला कलाकारांना काम करताना असंख्य आव्हानांना सामोरं जावं लागतं.कधीकधी कलाकार त्यांना आलेले अनुभव मनमोकळेपणाने शेअर करता. त्यात आता लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने नेहा धुपियाने तिच्या प्रेग्नंसीदरम्यानचा एक प्रसंग शेअर केला आहे.
नुकतीच नेहाने परिणीती चोप्राच्या 'मॉम टॉक्स'या नवीन टॉक शोमध्ये हजेरी लावली. यावेळी नेहाने तिच्या गरोदरपणातील धक्कादायक प्रसंगाविषयी सांगितला. साडेआठ महिन्यांची गरोदर असतानाही नेहा काम करत होती, त्यावेळी भर सेटवर तिला प्रसूती कळा येऊ लागल्या आणि सेटवर एकच गोंधळ उडाला. तो प्रसंग शेअर करताना नेहाने म्हटलं,मी साडेआठ महिन्यांनी गरोदर असतानाही काम केलं आहे.आई झाल्यावरही मला काम सुरू ठेवायचं होतं आणि शक्य तितक्या लवकर कमबॅक करायचं होतं. त्यावेळी शूटिंग सुरू असतानाच मला प्रसूती वेदना सुरू झाल्या. हे यशराज स्टुडिओमध्ये घडलं, जिथे मी काम करत होते. हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.
त्यानंतर नेहीने वर्किंग मदर्सच्या संघर्षांवर भाष्य करत म्हटलं,"एक वर्किंग मदर म्हणून समाजाच्या अपेक्षांचं ओझं पेलणं सर्वात कठीण असतं. आई झाल्यानंतरही एका महिलेला तिची स्वप्नं आणि तिचं करिअर जपण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. आई झाल्यावर आयुष्य पूर्णपणे बदललेच पाहिजे असं नाही. महिलांनी त्यांचं आयुष्य कसं जगायचं हे स्वतःच ठरवलं पाहिजे."
नेहा धुपियाने आजवर 'चुप चुप के', 'तुम्हारी सुलू', 'सिंग इज किंग', 'करीब करीब सिंगल', 'अ थर्सडे' अशा सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये लोकप्रिय भूमिका साकारल्या आहेत. मात्र, नेहा धुपिया तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत राहिली आहे. २०१८ मध्ये तिने अभिनेता अंगद बेदीसोबत लग्नागाठ बांधून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.नेहाच्या लग्नाच्या काही महिन्यांनंतर नेहा आणि अंगद नोव्हेंबर 2018 मध्ये त्यांची मुलगी मेहरचे जन्म झाला. यानंतर नेहा धुपियाने एका मुलाला जन्म दिला आहे, ज्याचे नाव तिने गुरिक ठेवलं आहे. आता नेहा आणि अंगदला दोन मुलं आहेत.