Malaika Arora Accident: अभिनेत्री मलायका अरोराच्या कारचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 10:13 PM2022-04-02T22:13:29+5:302022-04-02T22:14:25+5:30

Malaika Arora Accident: अपघातामध्ये मलायकाच्या डोक्याला मार लागल्याची माहिती समोर आली आहे. 

bollywood actress malaika arora hospitalized after a car accident in mumbai pune express way | Malaika Arora Accident: अभिनेत्री मलायका अरोराच्या कारचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Malaika Arora Accident: अभिनेत्री मलायका अरोराच्या कारचा अपघात; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

googlenewsNext

अभिनेत्री मलायका अरोराच्या कारला मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ अपघात झाल्याची घटना घडली आहे. मनसेच्या मेळाव्यासाठी जाणाऱ्या वाहनांना मलायकाच्या कारने धडक दिली. अपघातामध्ये जखमी झालेल्या मलायकाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नवी मुंबईमधील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. 

मुंबईकडील लेनवर सायंकाळच्या वेळेस हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यासाठी मनसे कार्यकर्ते पुण्यावरून मुंबईला येत असताना मलायकाची कार, ट्रॅव्हल्स व इतर दोन वाहनांचा अपघात झाला. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये मलायकाच्या डोक्याला मार लागल्याची माहिती समोर आली आहे. 

मनसे जनहित कक्षाचे सरचिटणीस जयराज लांडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मलाईकाला उपचारासाठी नवी मुंबईमधील अपोलो रूग्णालयात दाखल केले आहे. रुग्णालयात मलाईकाचे सिटीस्कॅन व इतर चाचण्या करण्यात आल्या आहेत. तिची प्रकृती स्थिर असून रविवारी घरी सोडले जाईल अशी माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.

Web Title: bollywood actress malaika arora hospitalized after a car accident in mumbai pune express way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.