आलियासाठी ‘मैदानात’ उतरली बेबो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 16:14 IST2016-06-23T10:44:37+5:302016-06-23T16:14:37+5:30

‘उडता पंजाब’मुळे करिना कपूर व आलिया भट्ट यांच्या चांगलीच मैत्री झालीय, असे दिसतेय. अलीकडे एका कार्यक्रमात करिनाने आलियाला किस ...

Beebo came out of the field for 'Ali! | आलियासाठी ‘मैदानात’ उतरली बेबो!

आलियासाठी ‘मैदानात’ उतरली बेबो!

डता पंजाब’मुळे करिना कपूर व आलिया भट्ट यांच्या चांगलीच मैत्री झालीय, असे दिसतेय. अलीकडे एका कार्यक्रमात करिनाने आलियाला किस करून तिच्या अभिनयाचे अगदी तोंडभरून कौतुक केले. यानंतर नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत बेबो आलियाला प्रोटेक्ट करताना दिसली. मुलाखतीदरम्यान पत्रकाराने आलियाला तिच्या आणि सिद्धार्थच्या ब्रेकअपबाबत प्रश्न विचारला. यावर आलिया जरा वैतागलेली दिसली. मी सिंगल आहे. माझे कुणाशीही ब्रेकअप वगैरे झालेले नाही. माझे कधी पॅचअप झाले, कधी ब्रेकअप झाले आणि पुन्हा कधी पॅचअप होणार, हे मला तुमच्याकडूनच(मीडिया) कळते. फक्त तुम्हीच यावर चर्चा करत असता, असे काहीशा नाराजीच्या सूरात आलिया म्हणाली. याचवेळी करिना आलियाच्या बाजूला बसलेली होती. मग काय, ती आलियाच्या बचावाला धावली. ती खूप तरूण आहे यार, तिला सध्या तरी सिंगल राहू द्या..असे करिना म्हणाली. करिना बचावाला उतरलेली पाहून मग आलियाचीही कळी खुलली, हे सांगणे नकोच!!

Web Title: Beebo came out of the field for 'Ali!