‘बेबो’ करणार ‘वीरें की शादी’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 13:17 IST2016-05-13T07:47:02+5:302016-05-13T13:17:02+5:30

अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच नव्या सिनेमात काम करणार आहे. अभिनेत्री सोनम कपूरची बहिण रिहा कपूरच्या दिग्दर्शनात बनणा-या 'वीरें ...

'Bebo' to 'Veeran Ki Marriage'! | ‘बेबो’ करणार ‘वीरें की शादी’ !

‘बेबो’ करणार ‘वीरें की शादी’ !

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: Mangal, serif; font-size: 12.8px; line-height: normal;">अभिनेत्री करीना कपूर खान लवकरच नव्या सिनेमात काम करणार आहे. अभिनेत्री सोनम कपूरची बहिण रिहा कपूरच्या दिग्दर्शनात बनणा-या 'वीरें की शादी' या सिनेमात बेबो काम करणार असल्याच्या चर्चा आहेत.

या सिनेमासाठी रिहा बेबोला साईन करणार आहे. 'वीरें की शादी' या सिनेमात 4 अभिनेत्री असतील. त्यापैकी एक रिहाची बहिण सोनम कपूर असणार हे निश्चित.. तर दुसरं नाव बेबोचं समोर आलंय. अभिनेत्री कॅटरिना कैफचं नावही समोर आलंय.

मात्र कॅटला अधिकृतरित्या ऑफर दिली नसल्याचं बोललं जातंय. दुसरीकडे हुमा कुरेशीनं या सिनेमात काम करण्यास नकार दिलाय. 'उडता पंजाब' या सिनेमानंतर बेबोनं दुसरा कोणताही सिनेमा साईन केलेला नाही. त्यामुळं ती वीरें की शादी करणार असल्याचं बोललं जातंय. 

reha kapoor

Web Title: 'Bebo' to 'Veeran Ki Marriage'!